दिलासादायक... "सिटीस्कॅन'चे दर ठरवण्यासाठी राज्य शासनाची समिती 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

दिलासादायक बातमी असून राज्य शासनाने एचआरसीटी अर्थात सिटीस्कॅन करण्याचे दर निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. पुढील सात दिवसांत पूर्ण अभ्यास करून सिटीस्कॅनचे कमाल दर ठरवण्याचे आदेश दिले आहेत. 

सांगली ः कोरोना रुग्णांची एचआरसीटी करणे काही प्रकरणात आवश्‍यक ठरत असून त्यात खुलेआम लूट सुरु झाली आहे. कुणीही कितीही दर आकारत आहे. या प्रकरणी राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आता दिलासादायक बातमी असून राज्य शासनाने एचआरसीटी अर्थात सिटीस्कॅन करण्याचे दर निश्‍चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. पुढील सात दिवसांत पूर्ण अभ्यास करून सिटीस्कॅनचे कमाल दर ठरवण्याचे आदेश दिले आहेत. 

याआधी रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर, रॅपीड अँटीजेन आणि रॅपीड अँटीबॉडी तपासण्यांसाठी दर निश्‍चित केले आहेत. आता एचआरसीटी करण्यासाठीचे दरही निश्‍चित होती. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सायन हॉस्पिटलच्या रेडीऑलॉजी विभागप्रमुख अनघा जोशी, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक अशा चार जणांची समिती असणार आहे. रुग्णालये आणि एचआरसीटी केंद्रांशी चर्चा करून हे दर निश्‍चित केले जाणार आहे. तसे आदेश राज्य शासनाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfortable ... State government committee to decide the rates of "Cityscan"

Tags
टॉपिकस
Topic Tags: