
चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
शिराळा : चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
जिल्हा वार्षिक नियोजन योजने अंतर्गत व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सुचवलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. या प्रकल्पात तेरा तळी बांधण्यात आली आहेत. सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारण्यात येणार आहे. उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे त्यांचे पालनपोषण करणे तसेच मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्य पिलांची साठवण करणे असे नियोजन आहे.
मत्स्यबीजचे सहायक आयुक्त अमर पाटील, वनसंरक्षक समाधान चव्हाण, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव, कराड) महादेव मोहिते, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती हणमंतराव पाटील, उपअभियंता अतुल केकरे, कनिष्ठ अभियंता पी. के. सुर्वे, एम. ए. थोरात, बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास नाईक, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, विजय महाडिक, तानाजी पाटील, संभाजी पाटील, मोहन पाटील, सखाराम दुर्गे, अरुण पाटील उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली