तडजोडीने मिटतात येथे तंटे!

- राजेश मोरे
बुधवार, 11 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार; सहा महिन्यांत ३२१३ खटले निकाली

अपघातात हात, पाय, डोळे गमावलेत, गंभीर जखमी होऊन अंथरुणावर खिळलेल्यांना अगर मृतांच्या वारसांना ‘न्याय आपल्या दारी’ योजनेने लाखमोलाचा आधार दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून गेल्या सहा महिन्यांत ३२१३ खटले निकाली निघाले. त्यातून १२ कोटी ७६ लाखांची सर्वसामान्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली. 

‘न्याय आपल्या दारी’ योजनेअंतर्गत ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण’ सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काम करते. अपघातग्रस्तांच्या न्यायालयात नुकसानभरपाईसाठी दाद मागावी लागते; मात्र अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला अगर त्याच्या वारसांना प्रत्येकवेळी हे शक्‍य होत नाही. त्यांनी दाद मागितली तर ते प्रलंबित राहणाऱ्या खटल्यामुळे त्रस्त होतात. अपघातग्रस्तास अगर त्याच्या कुटुंबास वेळेत नुकसानभरपाई मिळणे गरजेचे असते. याचा विचार करून ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आली. प्रलंबित खटले अगर दाखलपूर्व खटल्यात बहुतांश तडजोडी होऊ शकतात. मात्र त्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये चर्चा घडवून आणणे महत्त्वाचे असते. चर्चेतून मार्ग निघतो; मात्र त्यासाठी कोणीतरी पुढे यावे लागते. हेच काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाते.

न्यायालयात २०१०-११ पासून अपघातातील खटल्यात हात, पाय, डोळे गेलेले, गंभीर स्वरूपात जखमी झालेले अगर मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना गेल्या सहा महिन्यांत झालेल्या लोकन्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून न्याय देण्यात आला. एकाच दिवसात विमा कंपनी, अर्जदार, त्यांचे वकील, लोकअदालतीचे पॅनेल आणि जिल्हा बार असोसिएशन यांच्या प्रयत्नातून ३२१३ दिवाणी, फौजदारी आणि दाखलपूर्व खटले तडजोडीने मिटविण्यात आले. त्यात अपघातग्रस्तांना १२ कोटी ७६ लाख ३४ हजार ८४७ रुपयाची नुकसानभरपाई तडजोड मूल्य देण्यात आले. 

Web Title: compromise resolve here problems!