दिघंचीत वीजबिल दोन टप्प्यात भरण्याची सवलत 

Concession to pay electricity bill in two stages
Concession to pay electricity bill in two stages

दिघंची : कोणतीही सक्ती न करता वीज बिल आता दोन टप्प्यात भरण्यासाठी महावितरणचे उपअभियंता बालटे यांनी सवलत दिली आहे. सरपंच अमोल मोरे यांनी ग्राहक, ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या मागणीला अखेर यश आले. ग्राहकांनी सुद्धा थकीत वीज बिल दोन टप्प्यात भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले आहे. 

मार्च महिना सुरू असल्याने बॅंकांची वसुली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरीकडे कोरोनाच्या महामारीमुळे छोटे व्यवसाय ठप्प आहेत. अवकाळी मुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच महावितरणने थकीत वीज बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. वसुलीपोटी अनेक कनेक्‍शन तोडल्याने अनेक घरे अंधारात आहे. उष्णता वाढत असून विजेची कनेक्‍शन तोडल्याने महिला त्रासल्या आहेत. 

दिघंचीत वीजबिल वसुलीचा आलेख दरवर्षी वाढत असतो. मात्र कोरोनामुळे ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली. 15 मार्च रोजी सरपंच अमोल मोरे, ग्राहक वीजबिल भरण्यासाठी तयार आहेत. त्यांना एकरकमी व आताच बिल भरा, असा तगादा लावू नये यांनी वीजबिल भरण्यासाठी दोन टप्प्यांची सवलत द्यावी, अशी लेखी मागणी महावितरणकडे केली होती. 


दरम्यान, मागणीचा पाठपुरावा करीत सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रा. पं. सदस्याच्या शिष्टमंडळाने आटपाडी कार्यालयात उपअभियंता संजय बालटे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेअंती ज्यांची आर्थिक स्थिती अडचणीची आहे त्यांनी 50 टक्के भरावी. उर्वरित 15 दिवसात भरावी, असे ठरले. विकास मोरे, मुन्ना तांबोळी, मारुती भोसले, सागर ढोले, नवनाथ रणदिवे, शेखर मिसाळ, अजिनाथ रणदिवे, राहुल पांढरे, संजय वाघमारे उपस्थित होते. 

जे सक्षम आहेत त्या ग्राहकांनी पूर्ण वीजबिल भरावे. ज्यांची अडचण आहे त्यांनी 50 टक्के भरावे. तर शेतकऱ्यांना विजबिलाचे दंड व्याज पूर्ण माफ झाले आहे. मूळ बिलाच्या 50 टक्के रक्कम माफ झाल्याने उर्वरित रक्कम भरून महवितरणला सहकार्य करावे. 
- संजय बालटे, उपअभियंता, आटपाडी. 

वीज बिल भरणे सर्वांची जबाबदारी आहे. दिघंचीतील वीज ग्राहकांनी 50 टक्के वीजबिल भरावे. उर्वरित 15 दिवसांनी भरून महावितरणला सहयकार्य करावे. 
- अमोल मोरे, सरपंच 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com