मुख्यमंत्र्यांनी आरशात पाहावे, त्यांना कळेल : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

विरोधी पक्षनेता कोण असेल या सर्वच गोष्टींवर मुख्यमंत्री भविष्य वर्तवत आहेत. ती त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे; पण त्यांनी स्वतःला आरशात पाहावे.

कोल्हापूर : निवडणुकीत काय होणार, विरोधी पक्ष कोणता असणार, विरोधी पक्षनेता कोण असेल या सर्वच गोष्टींवर मुख्यमंत्री भविष्य वर्तवत आहेत. ती त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे; पण त्यांनी स्वतःला आरशात पाहावे. म्हणजे त्यांना विरोधी पक्ष नेता कोण असेल हे कळेल, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून कोल्हापुरात केली.

त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची हवा आता संपली आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सामान्यांनाही हे समजलं आहे की या दोन पक्षांच्या मागे उभं राहायला कोणी तयार नाही. आम्ही आरशात पाहत नाही. लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो. आरशात पहायची वेळ कोणावर आली आहे, हेही सांगण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना उत्तर दिले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Balasaheb Thorat attacks CM Devendra Fadnavis