अक्कलकोट बुथनिहाय समिती गठनासाठी काँग्रेसची बैठक

राजशेखर चौधरी
सोमवार, 25 जून 2018

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गट व पंचयात समिती गणा मध्ये असलेले बुथ निहाय समन्वय समिती गठित करण्यासाठी अक्कलकोट काँग्रेस भवन प्रमिला पार्क येथे आज बैठक घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, 

अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गट व पंचयात समिती गणा मध्ये असलेले बुथ निहाय समन्वय समिती गठित करण्यासाठी अक्कलकोट काँग्रेस भवन प्रमिला पार्क येथे आज बैठक घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, 
कॉग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष भीमाशंकर कापसे, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिपरगी,जिल्हा सरचिटणीस दिलीप बिराजदार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सातलींग शटगार, पंचायत समितीचे सदस्य विलासराव गव्हाणे, तालुका महिला अध्यक्षा  मंगला  पाटील, शहर अध्यक्षा सुनिता हडलगी, मैंदर्गी शहर अध्यक्ष निलकंठ मेंथे, नगरसेवक डाँ दिपमाला आडवितोटे, शहर महिला उपाध्यक्ष रेणुका म्हेत्रे, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे म्हणाले, की राष्ट्रीय काँग्रेस(आय) पक्षाच्या माध्यमातून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलेले भरीव विकास कामे पाहता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कार्यकरून काँग्रेस पक्षाशी जनतेची नाळ जोडण्याचे काम करावे. असे आवाहन म्हेत्रे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे ९ गट व पंचयात समितीच्या १७ गणामध्ये बुथनिहाय समन्वयकांची निवड करून नियुक्ती पत्र तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच या बैठकीत मल्लिकार्जुन पाटील, विकी चौधरी, दिलीप बिराजदार, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनीचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, रामचंद्र गद्दी, विश्वनाथ हडलगी, प्रकाश खांडेकर, रविकिरण वरनाळे, महिला सदस्य शिवमा म्हेत्रे, फातिमा बेग, धर्मराज गुंजले, नितीन ननवरे, सायबु गायकवाड, पांडुरंग चव्हाण, जगनाथ जाधव, बबन पवार, सुरेश पाटील, यलप्पा गवळी, बसू बनसोडे, अबुजर पटेल , संगमेश बमगोंडा  आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress meeting for formation of Akkalkot constituency