काँग्रेसला मोठा धक्का; भाऊसाहेब कांबळे यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

आमदार कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 

श्रीरामपूर : काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

आमदार कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 

कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज त्यांनी थोरात याची साथ सोडली.

आमदार कांबळे यांची आज सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, खासदार प्रताप जाधव, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते.कांबळे यांना सेनेने विधानसभेची उमेदवारी देण्याचे कबूल केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Bhausaheb Kamble resigns may be enters Shivsena