video : आमदार प्रणिती शिंदे निघाल्या पायी देवीच्या दर्शनाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आमदार प्रणिती शिंदे यांनी पहाटे 5 वाजता त्यांच्या 'जनवात्सल्य' बंगला ते थेट 'रूपा भवानी माता मंदिर' अशी पायी यात्रा काढून देवीचं दर्शन घेतले. 

सोलापूर : येथील जागृत देवस्थान म्हणून ज्याची ओळख आहे, 
ते म्हणजे 'रुपाभवानी मंदिर' हाेय. याच देवीच्या दर्शनासाठी आज आमदार प्रणिती शिंदे यांनी पहाटे 5 वाजता त्यांच्या 'जनवात्सल्य' बंगला ते थेट 'रूपा भवानी माता मंदिर' अशी पायी यात्रा काढून देवीचं दर्शन घेतले. 

नवरात्र महोत्सवातील आज  शेवटचा दिवस आणि विधानसभा निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आज पहिला दिवस आहे. याचेच आैचित्य साधून आमदार प्राणितींनी रूपा भवानी मातेचे दर्शन घेतलं आहे. 

दरम्यान, यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, स्त्री शक्तीचा प्रत्येकाने आदर-सन्मान केला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी एक स्त्री आहे, तीचे पावित्र्य जपलं पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Praniti Shinde rally in Solapur