काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भाजपसमोर आव्हान

- शिवाजीराव चौगुले
शनिवार, 21 जानेवारी 2017

भाजपला स्वाभिमानीची साथ शक्य - शिवाजीराव नाईकांना शह देण्याची रणनीती 

शिराळा - शिराळा तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्‍का देण्यासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी शिरसी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जाहीर करून भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

भाजपला स्वाभिमानीची साथ शक्य - शिवाजीराव नाईकांना शह देण्याची रणनीती 

शिराळा - शिराळा तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्‍का देण्यासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी शिरसी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जाहीर करून भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

शिराळा तालुक्‍यातील राजकीय समीकरणे नेहमी बदलत राहत आहेत. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असणारे दोन भाऊ निवडणुकीनंतर मात्र एकोपा होतो. बाजार समिती व इतर स्थानिक निवडणुका त्यांनी आघाडीच्या माध्यमातून लढवून शिवाजीराव नाईक यांना कायम शह देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हापरिषद निवडणुकात आघाडी होणार का, याबाबत सर्वत्र चर्चा असताना आघाडीची घोषणा झाली असल्याने त्यावर पडदा पडला आहे. आपल्या समोर दोन विरोधक कायम असणार याचे भान ठेवून आमदार नाईक यांनी आपल्या पद्घतीने राजकीय रणनीती आखली आहे. नुकत्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची भेट द्या मी तुम्हाला मंत्रिपदाची भेट देतो. असा राजकीय सौदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी पडली आहे. काही ही झाले तरी झेडपी, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी धडपड सुरू आहे.

भाजपला एकही जागा मिळवून न देता त्यांचा मोठ्या फरकाने पराजयासाठी आघाडीच्या माध्यमातून दोन भाऊंनी रान उठवले आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात आता राजकीय संपर्काचा धुरळा उडू लागला आहे. गण, गट निहाय उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.  इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. यावेळी दोन भाऊ, आमदार नाईक यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सावधगिरी बाळगून निर्णय घ्यावे लागणार आहेत.

कोकरूड गट खुला...
शिराळा तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे चार आणि पंचायत समित्यांचे आठ गण आहेत. त्यातील एकमेव कोकरूड गट सर्वसाधारण खुला आहे. यामुळे या मतदारसंघावर सर्वच पक्षांतील इच्छुकांचे लक्ष आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणही खुले असल्यामुळे कोकरूड गटासाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघावर विधान परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख गटाचे नेहमीच वर्चस्व आहे. येथील त्यांचे चिरंजीव, झेडपीचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. झेडपीवर काँग्रेसला सत्ता मिळाल्यास ते अध्यक्षपदाचे दावेदारही होऊ शकतात.

Web Title: Congress-NCP alliance challenge to bjp