चला, समृद्ध करुया आमराई 

चला, समृद्ध करुया आमराई 
Updated on

सांगली - आमराई उद्यानाला नवसंजीवनी देण्यासाठी महापालिकेने लोकसहभागातून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. चला आमराई जपुया उपक्रमात सहभाग द्यावा, असे आवाहन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केले आहे. निसर्गप्रेमींच्या सहभागाने राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत नागरिकांनी श्रमदान करावे, अशी अपेक्षा आहे. 

1846 मध्ये सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी आमराईची स्थापना केली. 173 वर्षे होत आहेत. 1985 मध्ये या उद्यानातील झाडांची मोजदाद करण्यात आली. सव्वाशे जातींचे वृक्ष आढळले. अनेक दुर्मिळ जातींचे वृक्ष होते. पूर्वी आमराईत चंदनाचीही विपुल झाडे होती. अलीकडे जागरूक निसर्गप्रेमींमुळे दुर्मिळ वृक्षांची रोपे लावणे, नवीन जातींची लागवड करणे याकडे लक्ष गेले. उद्यान "बोटॅनिकल गार्डन' म्हणून विकसित व्हावे इतकी गुणवत्ता आहे. 

""आमराई हेरिटेज प्रॉपर्टी आहे. ती समृद्ध करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जागेची उपलब्धता पाहता अजूनही मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्याचा मानस आहे. नागरिक व निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे.'' 
 - मौसमी बर्डे,
उपायुक्त महापालिका 

मोहिमेचे स्वरूप 
0 शनिवारी (ता.4) पहाटे 6 वाजता प्रारंभ. 
0 सकाळी 6 ते 9 या वेळेत स्वच्छता. 
0 रिकाम्या जागी वृक्ष लागवड. 
0 रिकामे वाफ्यांतून झाडे लावणे. 
0 बागकामासाठी झाडू स्वतःच घेऊन यावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Khillar cattle farming in Maharashtra
Almatti Dam water level latest news
Dhairyashil Kadam SIR campaign statement
Marathi News Esakal
www.esakal.com