दिलासा : कोल्हापूर कनेक्‍शनच्या येडेनिपाणीतील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

येडेनिपाणी (सांगली) - कोल्हापूरच्या पॉजिटीव्ह महिलेच्या संपर्कातील येथील त्या मुंबईस्थित 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावाने सुटकेचा पुन्हा निःश्वास घेतला. संबंधितांना इस्लामपूरात संस्थानात्मक विलगीकरणात ठेवण्यात असून मात्र रिपोर्ट चांगला आल्याने लोकांना धीर आला आहे. तत्पूर्वी गावात वातावरण टाईट झाले होते तर सर्वांना रिपोर्टची प्रतिक्षा लागून राहिली होती. 

कोल्हापुरच्या अंबप पाडळीतील त्या पॉजिटीव्ह महिलेचे येडेनिपाणी माहेर असून मुंबईवरून परतताना येथील नातेवाईक व इतर असे अकरा जणांसबोत तिने खासगी बसने प्रवास केला असून. मुंबईत ती यामधील नातेवाईकांसबोत एकत्र राहत होती. मंगळवारी तिचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली व तिच्या संपर्कात येडेनिपाणी कनेक्शन उघडकीस आले. येथील अकरा जणांना त्वरीत इस्लामपुरला संस्थात्मक कोरोनटाईन करून गुरूवारी त्यांचे स्वाब तपासणीसाठी मिरजेला पाठवले. 

दरम्यान; एकदम अकरा जणांना इस्लामपुरला हलविल्याने गावांला धास्ती लागून होती. गुरूवारी रात्री उशिरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. कामेरीच्या आरोग्य अधिकारी सुनंदा पाटील, सरपंच डॉ.सचिन पाटील, उपकेंद्राचे डॉ.सोमनाथ अंकोलीकर, पोलिस पाटील बाबासाहेब गुरव, ग्रामसेवक मधुकर हाताळे व कमिटी सदस्य गावात लक्ष ठेवून आहेत. 

"संबंधित ल़ोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावाला दिलासा मिळाला आहे. बाहेरून आलेल्यांची आम्ही योग्य ती काळजी घेत असून गावात सुरक्षिततेसाठी कोरोनाच्या बाबतीत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत." 

- सदस्य, ग्रामकोरोना दक्षता समिती, येडेनिपाणी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation: The report of 11 people in Yedenipani of Kolhapur connection is negative