बांधकाम ठप्प: गवंडी, बिगाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Construction halted : bricklayers & other laburs are in problem
Construction halted : bricklayers & other laburs are in problem
Updated on: 

झरे (जि. सांगली) : कोरोना विषाणूचा पादुर्भावच्या पार्श्वभूमीवर व लॉक डाऊन असल्याने खासगी बांधकाम विभागातील गवंडी व बिगारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सर्वच घरांची बांधकामे बंद आहेत. घरासाठी लागणारे साहित्य कुठे मिळेना, त्यामुळे गवंडी व बिगारी यांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही, "काम नाही तर दाम नाही' या म्हणीप्रमाणे त्यांना सध्या कोणतेही काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने त्यांचा विचार करून त्यांना मदत करावी, अशी मागणी खासगी बांधकाम विभागातील गवंडी व बिगारी करीत आहेत. 

बांधकामासाठी गवंडी व बिगारी यांना सध्या कोणतेही काम नाही. शासकीय घरकुलाची कामेसुद्धा जाग्यावरती थांबली आहेत. खासगी घर बांधकामसुद्धा जाग्यावरती थांबले आहे. त्यामुळे दररोज रोजंदारी करणारे बिगारी व गवंडी बांधकाम करणारे मजूर सध्या घरांमध्ये बसून आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. 

जमीन जुमला कमी असल्याने, दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, घरातील कोणी नोकरीसाठी नाही, मग कुटुंब चालवायचे कसे हा गंभीर प्रश्न गवंडी व मोलमजुरी करणारे बिगारी यांच्या पुढे पडला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने बिगारी म्हणून कामाला जातात सध्या सर्व बांधकाम व्यवसाय ठप्प असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. 

तरी शासनाने गवंडी व मोलमजुरी करणारे बिगारी यांचा विचार करून त्यांना जगण्यापूर्ती मदत करावी, अशी मागणी गवंडी व मोलमजुरी करणारे बिगारी करीत आहेत. 

लॉक डाऊनमुळे व्यवसाय बंद
लॉक डाऊनमुळे बांधकामासाठी सिमेंट व इतर साहित्य मिळत नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय बंद आहे. 
- गणेश राठोड, मोहन माने (गवंडी) 

बांधकाम बंद असल्याने खायचे वांदे

घरची परिस्थिती बेताची आहे. गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करून उपजीविका भागवितो, पण बांधकाम बंद असल्याने खायचे वांदे झाले आहेत. 
- संभाजी वाघमारे,  बिगारी)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com