जय श्रीराम ः अयोध्येत मंदिर उभारणीचा हा आहे मुहूर्त, पंतप्रधान मोदी येणार

Construction of Ram temple will be held in Ayodhya in April
Construction of Ram temple will be held in Ayodhya in April
Updated on: 

नगर ः संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागलेल्या राम मंदिराचा प्रश्‍न आता निकाली निघाला आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिरही बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीचीही तयारी सुरू झाली आहे. भूमिपूजनाचा सोहळाही भव्यदिव्य करण्यात येणार आहे. त्याच्या मुहूर्ताची तारीखही ठरली आहे. 

स्वामी गोविंददेवगिरी यांची माहिती 
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्‍वस्त तथा कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनीच त्याची रविवारी घोषणा केली. येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात स्वामी गोविंददेवगिरी यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. 
या कार्यक्रमास हभप मुंकुंदकाका जाटदेवळेकर, संजय मालपाणी यांच्यासह भाविक उपस्थित होते. 

तिरूपती ट्रस्टचे 100 कोटी 
श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मंदिर होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक भाविकांकडून मदतीची अपेक्षा आहे. तिरूपती ट्रस्टने राम मंदिरासाठी 100 कोटी रूपयांची देणगी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या वतीने एक कोटी रूपयांचा निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच जाहीर केले आहे. सर्वसामान्य भाविकांचाही मंदिर उभारणीत हातभार लागावा, यासाठी अयोध्येत भारतीय स्टेट बॅंकेत खाते उघडले जाईल. त्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करता येतील. 

ठाकरे यांचे घोषणा स्वागतार्ह 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन मदतीची घोषणा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ठाकरे यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. प्रत्येक राज्याने अयोध्येत आपापले भवन बांधावे, तसे झाल्यास अयोध्या ही देशाची सांस्कृतिक राजधानी होईल, असेही स्वामी गोविंददेवगिरी यांनी सांगितलं. 

ही आहे मुहूर्ताची तारीख 
श्रीराम जन्मभूमीत मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या हस्ते 30 एप्रिल रोजी हा भूमिपूजन सोहळा होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com