बेळगाव : भिंत कोसळून बांधकाम कामगार ठार

घराची जुनी भिंत ठरली ‘काळ’
 भिंत कोसळून बांधकाम कामगार ठार
भिंत कोसळून बांधकाम कामगार ठारsakal

बेळगाव: नवीन घराचे बांधकाम सुरू असताना शेजारील घराची मातीची भिंत अंगावर कोसळल्याने त्याखाली सापडून एक बांधकाम कामगार ठार, तर दोघे जखमी झाले. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ४.३० च्या सुमारास मारुती गल्ली मारुती मंदिर पाठीमागे असलेल्या वृंदावन हॉटेलनजीक ही दुर्घटना घडली आहे. कल्लाप्पा कऱ्याप्पा होसमणी (वय ६२, मूळ रा. नेरळीकट्टी, जि. धारवाड सध्या रा. टिळकवाडी) असे मृताचे नाव असून अर्जुन हरिजन, महेंद्र गुडीमनी (दोघेही रा. पट्टीहाळ, ता. बैलहोंगल) अशी जखमींची नावे आहेत.

मारुती गल्ली मारुती मंदिरच्या पाठीमागे असलेल्या वृंदावन हॉटेल नजीक जैन यांच्या मालकीच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. तळघरासाठी त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. तसेच आज नवीन घराचे बांधकाम सुरू असताना बाजूच्या घराची मातीची भिंत कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून कल्लाप्पा होसमणी जागीच गाडला गेला, तर अर्जुन आणि महेंद्र हे दोघे जखमी झाले. खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए. चंद्रप्पा, पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी एसडीआरएफ, अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देऊन पाचारण केले. त्यानंतर जवानानी ढिगाऱ्याखाली सापडून ठार झालेल्या बांधकाम कामगाराचा मृतदेह बाहेर काढला. ही माहिती संबंधित मृत बांधकाम कामगाराच्या नातेवाईकांना देऊन पाचारण करण्यात आले. खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन मृतदेह शल्यचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालय शवागृहात पाठविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com