संपर्क साधा...गंभीर आजार असणाऱ्यांना इस्लामपूर प्रशासनाचे आवाहन

Contact Islampur administration appeals to those with serious illness
Contact Islampur administration appeals to those with serious illness
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली) : सध्या शहरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांची उपचार व त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या उपचारांच्या दृष्टीने गैरसोय होऊ नये यासाठी त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी नागेश पाटील आणि गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 

ते म्हणाले, "सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. इस्लामपूर शहरात कोरोनाबधित २५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कडक उपाययोजना अमलात आणल्या आहेत. संसर्ग पसरू नये यासाठी इस्लामपूर शहर आणि परिसराचा संपर्क पूर्णता बंद केला आहे. या काळात काही गंभीर आजार असलेले किंवा ज्यांना सतत उपचार घ्यावे लागतात, अशा रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. अनेकदा ऐनवेळी पास मागणाऱ्या लोकांना पास उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा लोकांनी आधीच आमच्याकडे नाव नोंदणी केल्यास आम्हाला त्यांना सेवा देता येईल. काहींना रक्त बदलायचे असते तर काहींना डायलिसिस, केमोथेरपीसारखे उपचार सुरू असतात. यात सर्व स्तरातील लोक असू शकतात. यातील कुणाची गैरसोय होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नगरपालिकेत स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. संबंधितांनी वाळवा पंचायत समितीच्या 02342-224475 यावर संपर्क साधून आपली माहिती देऊन स्वतःची आणि प्रशासनाचीही संभाव्य गैरसोय टाळावी.

एकटे असणाऱ्यांनीही माहिती द्या!

लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व व्यवस्था बंद आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय शक्य आहे. जे लोक एकटे राहात आहेत किंवा ज्यांची कुटुंबे जवळ नाहीत किंवा जे लोक वृद्ध आहेत आणि इतरांच्यावर अवलंबून आहेत, अशा लोकांनीही संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com