शिंदेवाडीत कंटेन्मेंट झोन; 50 वर्षीय महिला पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढत असून, मिरज पूर्व भागातील शिंदेवाडी (पवारवस्ती) येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मिरज पूर्व भाग हादरून गेला आहे.

 

आरग :  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढत असून, मिरज पूर्व भागातील शिंदेवाडी (पवारवस्ती) येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मिरज पूर्व भाग हादरून गेला आहे. लोक वस्तीतील 200 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

सेच पुढील 300 मीटरचा भाग बफर झोन म्हणून सील केला आहे. 
शिंदेवाडी परिसरात कोरोनाची "एन्ट्री' झाल्यानंतर प्रशासनाने संचारबंदीसह निर्बंध अधिक तीव्र केले आहेत. घटनास्थळी त्वरीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर व वैद्यकीय अधिकारी नितीन चिकुर्डेकर, विस्ताराधिकारी सदाशिव मगदूम आदी प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर केला.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील एकूण 11 जणांची स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यांना मिरज येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच शेजारील लोक वस्तीतील एकूण 6 कुटुंबातील 37 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी मिरज कोरोना रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

कोरोनाचा शिरकाव झाल्याने पंचक्रोशीतील गावांनी सतर्कता बाळगत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दैनिक सकाळशी बोलताना वैद्यकीय अधिकारी नितीन चिकुर्डेकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Containment zone in Shindewadi; 50-year-old woman positive