'हिंदू-मुस्लिम भाई-भाई' नारा देऊन कर्दनकाळ असणाऱ्या शत्रूंना आपण जवळ करीत आहोत; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide : ''आपल्या सणांचा ‘इव्हेंट’ होत आहे; मात्र या गलिच्छ गोष्टींविरोधात कोणीही बोलत नाही, हे दुर्दैव आहे.''
Sambhaji Bhide
Sambhaji Bhide esakal
Updated on
Summary

‘‘शिवरायांनी हिंदूंना जगाचे बाप बनविण्याचा मार्ग दाखवला. दुर्गामाता दौड हा त्याचाच एक मार्ग आहे. नवरात्रीत दांडियासह पाश्‍चात्त्य संगीताचे प्रकारे म्हणजे सणांचा बट्ट्याबोळ करणारा प्रकार आहे.''

सांगली : भित्र्या हिंदूंमुळेच आपल्या सण-संस्कृतीचा बट्याबोळ झाला आहे, अशी कडवट टीका गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhajirao Bhide) यांनी येथे केली. नवरात्रीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे (Shiv Pratishthan Hindustan) आयोजित दुर्गामाता दौडीचा गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. त्यावेळी ते धारकऱ्यांसमोर बोलत होते.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

येथील मारुती चौकातील शिवतीर्थापासून दुर्गामाता दौडीचा प्रारंभ भाजपचे (BJP) प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक यांच्या हस्ते झाला. श्री. भिडे यांच्या वक्तव्याचे समाजमाध्यमांमध्ये दिवसभर पडसाद उमटत होते.

भिडे म्हणाले, ‘‘आपल्या सणांचा ‘इव्हेंट’ होत आहे; मात्र या गलिच्छ गोष्टींविरोधात कोणीही बोलत नाही, हे दुर्दैव आहे. हिंदूंचे सांस्कृतिक वैभव असणारे सण हे केवळ करमणूकीचे साधन बनत आहेत, हे थांबवण्याची गरज आहे. गणेशोत्सवाचा तर आधीच चोथा झालाय, त्याच्या पाठोपाठ दांडियाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवावरही अतिक्रमण होत आहे. त्यातून हिंदुत्वाचे तेज बाजूला जात आहे.’’

Sambhaji Bhide
शरद पवार माढ्यातून 'मविआ'ची कोणाला उमेदवारी देणार? विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याचं नाव चर्चेत

ते म्हणाले, ‘‘शिवरायांनी हिंदूंना जगाचे बाप बनविण्याचा मार्ग दाखवला. दुर्गामाता दौड हा त्याचाच एक मार्ग आहे. नवरात्रीत दांडियासह पाश्‍चात्त्य संगीताचे प्रकारे म्हणजे सणांचा बट्ट्याबोळ करणारा प्रकार आहे. अशा लोकांचा हिंदू समाज आपल्याला अभिप्रेत नाही. कारण, त्यांना आपले-परके, शत्रू-मित्र, वैरी-कैवारी, उपकारक-मारक यातील फरक कळनेसा झाला आहे.’’

Sambhaji Bhide
'तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार, RPI मध्ये या'; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर

ते म्हणाले, ‘‘जगातील १८७ देशांपैकी ७६ राष्ट्रांनी भारतावर आक्रमण केले आहे. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. सात दिवसांत भारताचे ५९ हजार सैनिक मारले गेले. एवढी भीषण हानी झाली. तेव्हांचे पंतप्रधान ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा नारा देत होते. ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ नारा देऊन कर्दनकाळ असणाऱ्या शत्रूंना आपण जवळ करीत आहोत.’’

महिलांची दुर्गा दौड निघणार

भिडे म्हणाले,‘‘ महिलांची स्वतंत्र दुर्गा दौड काढण्याचे नियोजन सुरू आहे. सामाजिक कार्यक्रम काहीतरी मिळवण्यासाठी राबवले जाताहेत. मात्र, दुर्गामाता दौडीत असले प्रकार चालणार नाहीत. यासाठीच महिलांची स्वतंत्र दुर्गा दौड काढली जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Pune Flood Alert Khadakwasla Dam Release Closes Riverbed Road Fire Brigade Rescues Trapped Youth
Supreme Court
Breaking Religious Barriers: Kerala Woman Wins Hearts by Performing Hindu Funeral
Marathi News Esakal
www.esakal.com