esakal | मिरजेत स्टेट बॅंकेतील  19 कर्मचा-यांना कोरोना...शाखेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

miraj state bank.jpg

मिरज (सांगली)- शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले. सर्वांची पुन्हा आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात येणार आहे. बॅंकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, असे शाखा व्यवस्थापकांनी जाहिर केले आहे. शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बॅंकेच्या सर्व वरिष्ठांसह, रिझर्व्ह बॅंक आणि जिल्हाधिका-यांनाही याबाबतचा अहवाल पाठवला आहे.

मिरजेत स्टेट बॅंकेतील  19 कर्मचा-यांना कोरोना...शाखेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (सांगली)- शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले. सर्वांची पुन्हा आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात येणार आहे. बॅंकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे, असे शाखा व्यवस्थापकांनी जाहिर केले आहे. शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बॅंकेच्या सर्व वरिष्ठांसह, रिझर्व्ह बॅंक आणि जिल्हाधिका-यांनाही याबाबतचा अहवाल पाठवला आहे.

दरम्यान, सरकारी कार्यालये, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची हजारो खाती या शाखेत असल्याने त्याचा परिणाम खातेदारांच्या सेवांवर होणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही अडचण झाल्याने वरिष्ठ व्यवस्थापनाने बॅंकेच्या मिरज शाखेचे तातडीने निर्जुंतकीकरण करुन घ्यावे. खातेदारांच्या सेवा सुरू करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे.भारतीय स्टेट बॅंकेची मिरज शहरातील मुख्य शाखा शिवाजी रोडवर पंचायत समितीशेजारी आहे.

या बॅंकेत शहरातील पन्नासहुन अधिक शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी यांच्याशिवाय कित्येक हजार निवृत्त सरकारी, निमसरकारी कर्मचा-यांची खाती या शाखेत आहेत. ही सर्व कार्यालये आणि त्यांच्याशी संलग्न घटकांना बॅंक बंद राहण्याचा मोठा फटका बसणार आहे. शाखेत नियमीतपणे किमान चार ते पाच हजार खातेदार विविध व्यवहारांसाठी येतात. सर्वांचा बॅंकेतील कर्मचा-यांशी संबंध येतो. प्रामुख्याने सत्तरीपार निवृत्तीवेतन धारकांसह सर्वच सरकारी व्यवहार असणा-या हजारो खातेदारांची शाखेतील वर्दळ ही बॅंकेतील कर्मचा-यांसाठी जिकीरीची बाब बनली आहे. 

""मिरज शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील तब्बल 19 कर्मचारी तपासणीत पॉझीटिव्ह आल्याने शाखेचे कामकाज चालवणे सामान्य खातेदार आणि कर्मचा-यांसाठी धोक्‍याचे असल्याने काही दिवसांसाठी तरी या मुख्य शाखेचे कामकाज बंद ठेवावे लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने बॅंकेच्या प्रवेशद्वारातच कोव्हीड प्रतिबंधीत क्षेत्र असा फलक लावला आहे. याचा अहवाल वरिष्ठांसह जिल्हाधिका-यांनाही पाठवला आहे.'' 

-श्री. देशपांडे, 
शाखा व्यवस्थापक, मुख्य शाखा मिरज 

संपादन : घनशाम नवाथे 

loading image
go to top