
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. पालिका क्षेत्रात धोका वाढतो असून आज दिवसांत सांगलीत सहा आणि मिरजेत पाच जण बाधित आढळून आले. दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव, खानापूर आणि महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 321 रुग्ण उपचार आहेत.
आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 429 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 5 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 276 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 15 जण कोरोना बाधित आढळले. आटपाडी, जत आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी दोघांना बाधा झाली. तर खानापूर तालुक्यात तिघांना बाधा झाली.
कडेगाव, पलुस, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. महापालिका क्षेत्रातील सांगली शहरात सहा, तर मिरज शहरात पाच रुग्ण आढळून आले. तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अत्तापर्यंत 1769 जणांना मृत्यू झाला. 31 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 321 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 52 जण चिंताजनक आहेत. 213 रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. 108 जण रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील चित्र
आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48920
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46830
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 321
आजअखेर जिल्ह्यातील मृत्यू- 1769
ग्रामीण भागातील रुग्ण- 24728
शहरी भागातील रुग्ण- 7298
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16894
कोरोना तालुकानिहाय स्थिती
आटपाडी- 2565
जत- 2374
कडेगाव- 2981
कवठे महांकाळ- 2496
खानापूर- 3052
मिरज- 4574
पलूस- 2637
शिराळा- 2302
तासगाव- 3474
वाळवा- 5571
महापालिका- 16894
एकूण - 48920
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.