कोरोना ः नगरमध्ये सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांची पुढच्या वर्गात ढकलगाडी

Corona: All six million students push the next class
Corona: All six million students push the next class
Updated on

नेवासे: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील 4968 शाळांमधील 6 लाख 19 हजार 143 विद्यार्थी यंदा थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. सातत्यपूर्ण, सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रारंभी जिल्ह्यातील शाळांना 17 ते 31 मार्चदरम्यान सुटी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा निर्णय देशव्यापी घेण्यात आला. परिणामी, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला.

सध्याची स्थिती पाहता, शिक्षण विभागाने यंदाचा निकाल सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 6 लाख 19 हजार 143 विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. 

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या 4968 शाळा आहेत. त्यांत जिल्हा परिषदेच्या 3573, महापालिकांच्या 12, नगरपालिकांच्या 37, समाजकल्याण 36, खासगी शाळा 737, तर अन्य 573 शाळांचा समावेश आहे. संचारबंदीमुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे जवळपास अशक्‍य आहे. परिणामी, वर्षभरात झालेल्या चार चाचण्या व स्वाध्यायाच्या आधारे गुणांकन करून शाळांचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

शिक्षकांच्या नोंदीच्या आधारे निकाल 
आरटीईनुसार वर्षभर करावयाच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनामध्ये पास व नापासची प्रक्रियाच नाही. त्यामुळे विद्यार्थी पुढील वर्गात जाण्यासाठी पात्र असतात. वर्षभर साधनतंत्रानुसार घेतलेल्या चाचण्या व प्रथम सत्रात केलेल्या आकस्मित मूल्यमापनात आकारिक आणि संकलित, अशा दोन्ही पद्धतीने लेखी व तोंडी मूल्यमापनाच्या विद्यार्थीनिहाय नोंदी शिक्षकांनी केल्याचे सांगण्यात आले. 
 
कोरोनापासून बचाव करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसली, तरी वार्षिक अभ्यासक्रम प्रामुख्याने पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कुठलाही परिणाम होणार नाही. "लर्निंग फॉर्म होम'अंतर्गत पालकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप, लिंक, ऑनलाइन टेस्ट आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. रोज 5-10 पालकांना फोन करून शिक्षक अभ्यासाचा आढावा घेत आहेत. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, नगर 
 

तालुकानिहाय शाळा व विद्यार्थिसंख्या 
तालुका.....शाळा....विद्यार्थी 
- नेवासे.....343....52145, - शेवगाव....307....36169, - पाथर्डी....371....34848 
- जामखेड...219....20744, - कर्जत.....328....29401,- श्रीगोंदे....441....37498 
- नगर......342....4622, - राहुरी.....344....44888,- श्रीरामपूर...221....39263 
- राहाता.....249....46338, - कोपरगाव...256....46396, - संगमनेर....485....64158 
- अकोले....474....36354, - पारनेर.....424....34318, - मनपा.....165....50402 
एकूण 4968 ...... 619143 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com