कोरोना विचारतोय.. " येऊ का घरात?'

दिलिप क्षीरसागर - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कामेरी (सांगली) ः दादा कोंडके गेले तरी त्यांची लोकप्रियता अजूनही अगदी नव्या पिढीतही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांची नावेच त्यांच्या स्वभावाची प्रचिती द्यायची या चित्रपट शिर्षकांची गुंफण करून कोरोना प्रबोधनाचा सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यातून दादांच्या चित्रपटाची लोकप्रियताही स्पष्ट होते.

कामेरी (सांगली) ः दादा कोंडके गेले तरी त्यांची लोकप्रियता अजूनही अगदी नव्या पिढीतही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांची नावेच त्यांच्या स्वभावाची प्रचिती द्यायची या चित्रपट शिर्षकांची गुंफण करून कोरोना प्रबोधनाचा सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यातून दादांच्या चित्रपटाची लोकप्रियताही स्पष्ट होते.
मेसेज असा ः तोंडाला रंग लावून, एकाच जन्मात अनेक जन्म जगणाऱ्या, क्षणात दाही दिशा फिरुन येणाऱ्या 'सोंगाड्या'ला विचारले लॉकडॉऊन मध्ये घरात बसुन कस वाटतयं? तो म्हणाला, सतत कोरोना येऊ का घरात' विचारतोय. त्याला बाहेरच थोपवून ठेवण्याची जबाबदारी घेवुन "पांडु हवालदार' आपला जीव धोक्‍यात घालत आहे. आता हा कोरोना इतका पसरतोय की ही जबाबदारी आपल्याही "आली अंगावर' आहे. मात्र या महामारीची चेष्टा करुन "बोट लावीन तिथ गुदगुल्या' सारखं जगतोय. त्यात टी व्ही वरील नियम तोडणाऱ्यांच्या बातम्या पाहिल्यावर "आंधळा मारतोय डोळा' असं वाटतं पण एक सांगू कार्यालयात जायचेच नसल्याने घरी प्रत्येक जण घरात "एकटा जीव सदाशिव' आहे. पण तुम्हाला सांगतो तुमच्याकडेही कोणी पाहुणा आला तर त्याला "राम राम गंगाराम' करु नका. त्याला नंतर भेटण्यासाठी बोलवा. अगदी सासरच्यांना ही. समजा त्यांचेआग्रहाचे निमंत्रण आले तरी त्यांना सांगा "सासरचं धोतर' घ्यायला मी संचारबंदी संपल्यानंतर येइन. पत्नीने बाहेर फिरायला जाणेसाठी "मला घेवुन चला' म्हणून अशी कितीही गळ घातली तरी तिची "पळवा पळवी' करु नका. मायबापांनो घरातच रहा. लाडानेही लहानग्यांचा 'मुका घ्या मुका' हा हट्ट पुरवू नका. कारण कोरोनाला ते धोकादायक असून घातक आहे. आपल्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार घरात दिवे लावताना माझ्या" अंधेरी रात मे दिया तेरे हात में' ची आठवण नक्कीच आली असणार. सध्या आपणाला घरात बसून कंटाळा येऊ लागल्याने घरकामात मदत केल्यामुळे आपली सहचारिणी नक्की म्हणत असेल जन्मोजन्मी "ह्योच नवरा पाहिजे' म्हणून. पण एक सांगू का मित्रांनो आपण संचारबंदीचे नियम पाळून उज्वल भविष्याची 'आगे की सोच' ठेवून सर्व कुटुंबाबरोबर 'तुमचं आमचं जमलं' म्हणत स्नेह वाढवुयात आणि या कोरोना रुपी संकटाला या देशातून हद्द पार करण्याचा निर्धार पक्का करुयात.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona asks " May i come to home?"