जावयामुळे सासऱ्याला कोरोनाची लागण... बीडातून नगरला आले होते भेटायला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोना बाधित रुग्ण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील पिंपळा गावचा रहिवासी आहे. गाव जरी बीड जिल्ह्यात असले तरी नगर शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरवर आहे. या गावातील बाधित रुग्ण आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता.

नगर ः  पिंपळा(ता. आष्टी, जि. बीड) येथील दोघे जण नगरमधून काही दिवसांपूर्वी जावई जमातवरून आल्याने भेटण्यासाठी आलमगीरला आले होते. त्या दोघांनी 23 मार्चपर्यंत नगरमध्ये मुक्काम केला. चार दिवसांपूर्वी ते पिंपळा येथे दाखल झाले होते. त्यांना नगरमध्ये होम क्वारंटाईन केले होते, ते येथून पळून गेले अशीही चर्चा होती.. पॉझिटिव्ह रुग्णाबरोबर असलेल्या एकाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. 

काल रात्री उशिरा 83 व्यक्तींच्या स्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी पिंपळा येथील व्यक्ती बाधित आढळली. 

येथील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमावरून परतलेल्या व्यक्तींमुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढला. 26 कोराना बाधित व्यक्तींपैकी नगर व नेवासे येथील दोन बाधित व्यक्तींचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या बुथ हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात 23 बाधित निगराणीखाली आहे. श्रीरामपूरचा एक बाधित रुग्ण ससूनमध्ये दाखल आहे. 
दरम्यान, आज सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील 85 व्यक्तींचे अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवले आहे. या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. 
 
दहा गावे अनिश्‍चित काळासाठी बंद 
कोरोना बाधित रुग्ण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील पिंपळा गावचा रहिवासी आहे. गाव जरी बीड जिल्ह्यात असले तरी नगर शहरापासून अवघ्या २५ किलोमीटरवर आहे. या गावातील बाधित रुग्ण आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता.

आता बीड जिल्हा प्रशासनाने पिंपळ्याजवळील सुंबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, खरगव्हाण, ढोंबळसांगवी यासह भोवतालची दहा गावांच्या सीमा सील केल्या आहेत. तालुक्‍यातील लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटेफळ व कोयाळ ही पाच गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही गावे अनिश्‍चित कालावधीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. दरम्यान, आज आरोग्य विभागाच्या पथकाने संपूर्ण गावांमध्ये सर्वेक्षण केले असून, सर्दी, खोकलाबाबत विचारणा केली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in Beed district due to Ahmednagar district