esakal | कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना सर्व योजनचा लाभ देणार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना सर्व योजनचा लाभ देणार

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना सर्व योजनचा लाभ देणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोनामुळे (corona) दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १८ असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ६६६ आहे. बालकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी टास्क फोर्सने झटून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन केले आहे. या समितीची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना शालेय प्रवेश फी भरण्याबाबत अडचणी निर्माण होवू नयेत याकरिता सर्व बालकांची शैक्षणिक माहिती एकत्रित करून या बालकांना शालेय फी बाबत यथायोग्य मदत मिळवून द्यावी.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

बालकांचे अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावेत.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १८ असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ६६६ आहे. यापैकी ६५१ बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल पूर्ण करण्यात आलेले आहेत. ५७२ बालकांना बाल संगोपन योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. १२ अनाथ बालकांचे संयुक्त बँक खाते उघडण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

loading image
go to top