esakal | कोरोना रक्त तपासण्यासाठी व्हायराल झालेली यादी खोटी...
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona blood check list goes viral is fake...

कोरोना रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत आहे. मात्र कोणासाठी अशी कोणती रक्त तपासणी केली जात नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून केला आहे.

कोरोना रक्त तपासण्यासाठी व्हायराल झालेली यादी खोटी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत आहे. मात्र कोणासाठी अशी कोणती रक्त तपासणी केली जात नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून केला आहे. पण या यादीत असलेल्या हॉस्पिटलला मात्र नागरिकांकडून तपासणीसाठी चौकशी करण्यात येत असल्याची आहे.

कोणासाठी रक्त तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही हॉस्पिटलची यादी तयार केली असून ती यादी सध्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांतील काही हॉस्पिटलची यादी टाकण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील एक, मिरजेतील तीन आणि सांगलीतील सहा हॉस्पिटलची नावे या यादीत आहेत. 

यामुळे व्हायरल झालेल्या यादीतील हॉस्पिटलची नावे पाहून नागरिकांनी संबंधित हॉस्पिटलकडे रक्त तपासण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर नागरिक स्वतः हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले, त्यावेळी अशी कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात येत आहे. कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ("नसो फैरिंजीयल स्वाब')घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. 

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यादीतील हॉस्पिटलकडे तपासणीबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. 

loading image