कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 62 रूग्ण आढळले...दोघांचा मृत्यू...मिरजेत 24 जण बाधित...रूग्णसंख्येने आठशेचा टप्पा ओलांडून 841 चा आकडा गाठला... 

घनशाम नवाथे
Thursday, 16 July 2020

सांगली-  जिल्ह्यात बुधवारी कोरोना बाधित 76 रूग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेल्यानंतर आज त्याखालोखाल 62 रूग्ण आढळले. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 29 रूग्ण असून त्यामध्ये मिरज शहरातील 24 जणांचा समावेश आहे. तसेच आटपाडी तालुक्‍यात 16, शिराळा तालुक्‍यात सात, मिरज तालुक्‍यात सहा, कडेगाव तालुक्‍यात दोन, घोरपडी (ता. कवठेमहांकाळ), शिगाव (ता. वाळवा) येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आठशेचा ठप्पा ओलांडून 841 चा आकडा गाठला. तर पंढरपूर रस्ता मिरज येथील 73 वर्षीय वृद्धाचा आणि शिगाव (ता. वाळवा) येथील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दिवसभरात 15 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

महापालिका क्षेत्रात बुधवारी सर्वाधिक 69 रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आजच्या रूग्णसंख्येत सर्वाधिक रूग्ण महापालिका क्षेत्रात 29 आढळले. त्यामध्ये मिरजेतील 24 आणि सांगलीतील पाचजणांचा समावेश आहे. मिरज तालुक्‍यात आज सहा रूग्णांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. त्यामध्ये बुधगाव येथील तीन, नांद्रे, कवलापूर व दुधगाव येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. दुधगाव येथील कोरोना बाधित रूग्ण कवठेपिरान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावळवाडी येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होता. नांद्रे येथेही पहिला रूग्ण आढळला आहे. 

आटपाडी तालुक्‍यात दिवसभरात 16 रूग्ण "पॉझिटीव्ह' आढळले. त्यामध्ये नेलकरंजी येथे आणखी सात रूग्णांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. तसेच तळेवाडी येथेही तीन, अर्जुनवाडी, शेटफळे येथे प्रत्येकी दोन तर तडवळे, हिवतड येथे एक रूग्ण आढळला. 
शिराळा तालुक्‍यात दिवसभरात सात रूग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये रेड येथे पाच आणि बांबरवाडीत दोन रूग्ण बाधित आढळले. कडेगाव तालुक्‍यात तोंडोली व भिकवडी खुर्द येथील रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) व शिगाव (ता. वाळवा) येथेही एक रूग्ण आढळला. 

आज मिरजेतील पंढरपूर रस्ता येथील 73 वर्षीय हॉटेल व्यवसायिक आणि शिगाव (ता. वाळवा) येथील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 25 वर गेली आहे. आज दिवसभरात 15 रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर सध्या 21 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यापैकी 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे बाधित रूग्ण- 841 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 396 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 420 
  • आजअखेरचे मृत रूग्ण- 25 
  • आजअखेरचे ग्रामीण रूग्ण- 552 
  • आजअखेरचे शहरी रूग्ण- 68 
  • महापालिका क्षेत्र रूग्ण- 221 
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: Another 62 patients found in the district .Two died . 24 in Miraj . The number of patients crossed the 800 mark and reached 841.