कोरोना ब्रेकिंग : उपनिरीक्षकासह सहा पोलिस "पॉझिटीव्ह'...सांगलीतील तीन व आटपाडीतील तीन 

घनशाम नवाथे
Thursday, 23 July 2020

सांगली- जिल्हा पोलिस दलातील एका उपनिरीक्षकांसह सहा पोलिस कोरोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन कर्मचारी आणि आटपाडी पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी अशा सहाजणांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

सांगली- जिल्हा पोलिस दलातील एका उपनिरीक्षकांसह सहा पोलिस कोरोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन कर्मचारी आणि आटपाडी पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी अशा सहाजणांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

मिरज शहर पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक निरीक्षकास "कोरोना' झाल्याचे सोमवारी (ता.20) स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सर्वांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर आज आणखी सहा पोलिस "पॉझिटीव्ह' आल्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सांगली महापालिकेच्यावतीने "ऍन्टीजेन' चाचणी तीन-चार दिवसापासून सुरू आहे. शहर, ग्रामीण पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची ऍन्टीजेन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच वाहतूक शाखेकडील दोन कर्मचारी देखील बाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

तसेच जिल्हा पोलिस दलातील आटपाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन पोलिसांचा अहवाल देखील "पॉझिटीव्ह' आला आहे. आटपाडी ठाण्यात कार्यरत असलेले बनपुरी आणि नागज आणि अन्य एक अशा तीन बाधित असल्याचे समजल्यानंतर आटपाडी तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गेले चार महिने पोलिस बंदोबस्तात आहेत. सीमेवर तर अहोरात्र पहारा आहे. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सर्व पोलिस दलाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दक्षता घेऊनही पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे, त्यामुळे आता इतरांनी दक्षता घेऊन "लॉकडाउन' चे नियम पाळण्याची आवश्‍यकता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking: Six policemen 'positive' including sub-inspector . three in Sangli and three in Atpadi