कोरोनाने हजारचा टप्पा ओलांडला; चौघांचा मृत्यू...दिवसभरात 64 रूग्ण : महापालिका क्षेत्रात 40 रूग्ण

घनशाम नवाथे
Sunday, 19 July 2020

सांगली-  जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णसंख्येचा हजारचा टप्पा आज ओलांडला गेला. दिवसभरात 64 कोरोना बाधित आढळले असून रूग्णसंख्या 1014 वर पोहोचली. तर आज बेळंकी (ता. मिरज) येथील 34 वर्षाचा पुरूष, सांगलीतील 70 वर्षाचा पुरूष, मिरजेतील 48 आणि 65 वर्षीय पुरूष अशा जिल्ह्यातील चौघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर 33 मृत झाले आहेत. तसेच अथणी (जि. बेळगाव) येथील 40 वर्षीय पुरूषाचा देखील मृत्यू झाला. 

सांगली-  जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णसंख्येचा हजारचा टप्पा आज ओलांडला गेला. दिवसभरात 64 कोरोना बाधित आढळले असून रूग्णसंख्या 1014 वर पोहोचली. तर आज बेळंकी (ता. मिरज) येथील 34 वर्षाचा पुरूष, सांगलीतील 70 वर्षाचा पुरूष, मिरजेतील 48 आणि 65 वर्षीय पुरूष अशा जिल्ह्यातील चौघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर 33 मृत झाले आहेत. तसेच अथणी (जि. बेळगाव) येथील 40 वर्षीय पुरूषाचा देखील मृत्यू झाला. 

जिल्ह्यात शनिवारी 48 रूग्ण आढळले होते. त्यानंतर आज दिवसभरात 64 रूग्ण जिल्ह्यात आढळले. महापालिका क्षेत्रात आज एकुण 40 रूग्ण आढळले. त्यापैकी 25 रूग्ण सांगलीतील तर 15 रूग्ण मिरजेतील आहेत. 40 रूग्ण आढळल्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येने तीनशेचा टप्पा ओलांडून 332 चा आकडा गाठला आहे. आज खानापूर तालुक्‍यात सात रूग्ण कोरोना "पॉझिटीव्ह' आढळले. त्यापैकी खानापूरमध्ये सहा आणि मादळमुठी येथील एकजण आहे. मिरज तालुक्‍यात आज सहा रूग्ण बाधित आढळले. त्यामध्ये दुधगाव येथील चौघांचा समावेश आहे. दुधगाव येथील आरोग्य सेवक नुकतेच बाधित आढळला होता. आता त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, आत्या आणि भाची अशा चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्‍यात भोसे येथील दोघेजण बाधित आढळले. शिराळा तालुक्‍यात कुंभारवाडी येथे दोन आणि शिराळा येथे एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

तासगाव तालुक्‍यात सावळज आणि तासगाव शहरात रूग्ण आढळला. वाळवा तालुक्‍यात शिगाव आणि वाटेगाव येथील रूग्णाचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. कवठेमहांकाळ तालुक्‍यात आरेवाडी आणि आगळगाव येथील रूग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच नेलकरंजी (ता. आटपाडी) व कडेगाव येथेही प्रत्येकी एक रूग्ण आढळला. दिवसभरात 64 रूग्ण आढळले असून एकुण रूग्णसंख्या 1014 वर पोहोचली. सद्यस्थितीत पॉझिटीव्ह रूग्णांपैकी 17 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यापैकी 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 
आज दिवसभरात बेळंकी (ता. मिरज) येथील 34 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. तर सांगलीतील 70 वर्षीय वृद्धाचा, मिरजेतील 48 वर्षीय पुरूष आणि 65 वर्षीय वृद्ध अशा चौघांचा मृत्यू झाला. कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या अथणी (जि. बेळगाव) येथील 40 वर्षीय पुरूषाचा देखील मृत्यू झाला. परजिल्ह्यातील 53 रूग्ण मिरजेतील रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेर पॉझिटीव्ह रूग्ण- 1014 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 546 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 435 
  • आजअखेर मृत झालेले रूग्ण- 33 
  • ग्रामीण भागातील एकुण रूग्ण- 599 
  • शहरी भागातील एकुण रूग्ण- 83 
  • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 332 

तालुकानिहाय आजअखेर रूग्ण- 
आटपाडी- 80, जत- 106, कडेगाव- 51, कवठेमहांकाळ- 27, खानापूर- 34, मिरज- 66, पलूस- 61, शिराळा- 150, तासगाव- 28, वाळवा- 79, महापालिका क्षेत्र- 332. 
.................. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crossed the thousand mark; Death of four . 64 patients in a day: 40 patients in municipal area