कामेरी येथे कोरोनाने एकाचा मृत्यू...वाळवा तालुक्‍यात तीन रूग्ण आढळले 

धर्मवीर पाटील 
Friday, 17 July 2020

इस्लामपूर (सांगली)- वाळवा तालुक्‍यातील आज चौघेजण "कोरोना' पॉझीटीव्ह निष्पन्न झाले. त्यापैकी काल (ता.16) रात्री एकाचा मृत्यु झाला आहे. मृत व्यक्ती कामेरी येथील असून ती भिवंडी येथे नोकरी निमीत्त वास्तव्यास होती. 11 जुलैला ती गावाकडे आली होती. 

वाळवा तालुक्‍यातील कामेरी येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी भिवंडीतून 11 जुलै रोजी गावाकडे आलेल्या व्यक्तीचा कोरोनाने गुरूवारी रात्री मृत्यू झाला. लक्षणे विचारात घेऊन आरोग्य विभागाने तपासणीसाठी स्वॅब घेतले होते. आज सकाळी त्याचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला. तर कोरोना बाधित दुसरी व्यक्ती 37 वर्षे वयाची असून ती भुसावळ येथून कामेरीत 10 जुलैला आली होती. ही व्यक्ती पोलिस कर्मचारी आहे.

तसेच आज इस्लामपूर - वाघवाडी रस्त्यावरील अभियंता नगर येथे 27 वर्षे वयाचा युवक कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. हा युवक 30 जुनला गावाकडे आला होता. तसेच साखराळे (ता. वाळवा) येथे 60 वर्षे महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ही व्यक्ती सूरत येथून 16 जुलै रोजी साखराळेत आली आहे. या चारही रुग्णांशी संबंधीत 23 जणांना इस्लामपूर येथील कोवीड सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. वाळवा तालुका आरोग्य विभाग व प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona dies at Kameri . Three patients found in Valva taluka