esakal | "कोरोना' इफेक्‍ट : एसटीचे सव्वा चार कोटीचे उत्पन्न बुडाले 
sakal

बोलून बातमी शोधा

st aagar.jpg

सांगली-"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. "कोरोना' मुळे सांगली विभागाचे दहा दिवसात सव्वा चार कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. जिल्ह्यातील दहा एसटी आगार बंद असल्यामुळे तेथे स्वच्छता मोहिम सुरू आहे. आज सांगलीचे मध्यवर्ती बसस्थानक महापालिका अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचा फवारा करून स्वच्छ करण्यात आले. 

"कोरोना' इफेक्‍ट : एसटीचे सव्वा चार कोटीचे उत्पन्न बुडाले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-"कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. "कोरोना' मुळे सांगली विभागाचे दहा दिवसात सव्वा चार कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. जिल्ह्यातील दहा एसटी आगार बंद असल्यामुळे तेथे स्वच्छता मोहिम सुरू आहे. आज सांगलीचे मध्यवर्ती बसस्थानक महापालिका अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचा फवारा करून स्वच्छ करण्यात आले. 

"कोरोना' चे रूग्ण वाढत असल्याचे पाहून दहा दिवसापासूनच राज्य परिवहन विभागाने दक्षता घेतली होती. शाळा, महाविद्यालये बंद झाल्यामुळे 14 मार्च रोजी 6 हजार 36 पैकी 864 फेऱ्या रद्द केल्या. तसेच मुक्कामास येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची धूर आणि औषध फवारणी करून स्वच्छता केली गेली. तसेच चालक-वाहक आणि एसटी चे कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर्सचे वाटप केले गेले. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, केमिस्ट संघटना आदींनी पुढाकार घेतला. 

14 मार्चनंतर दररोज विविध मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याचा आकडा वाढवण्यात आला. एसटीचे एक मार्चपासून भारमान वाढवा अभियान सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच "कोरोना' मुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. दररोज लाखो रूपयांचे उत्पन्न बुडत गेले. 22 मार्चपासून एसटी च्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सांगली विभागातील दहा आगारातील 6 हजार 36 फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. दररोजचे साधारणपणे 70 ते 74 लाखाचे उत्पन्न बुडत आहे. गेल्या दहा दिवसात एसटीचे सव्वा चार कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 

शासनाच्या आदेशानुसार एसटी आगारात केवळ पाच टक्के कर्मचारी कामकाजासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या एसटी फेऱ्या बंद असल्यामुळे काही आगारात स्वच्छता मोहिम सुरू आहे. सांगली आगारात महापुरानंतर पुन्हा एकदा अग्निशमन दलाची गाडी आणून पाण्याचा फवारा करून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तसेच औषध फवारणी देखील केली आहे.