esakal | "कोरोना' चा परिणाम : मार्केट यार्डातील 300 कोटीची उलाढाल ठप्प 

बोलून बातमी शोधा

market yard.JPG

सांगली- "कोरोना' चा प्रसार रोखला जावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेती मालाचे सौदे बंद ठेवले आहेत. दोन आठवड्यात 300 कोटीहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेमुळे मार्केट यार्डातील धान्य आणि किराणा मालाची दुकाने मात्र सुरू ठेवली आहेत. 

"कोरोना' चा परिणाम : मार्केट यार्डातील 300 कोटीची उलाढाल ठप्प 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' चा प्रसार रोखला जावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेती मालाचे सौदे बंद ठेवले आहेत. दोन आठवड्यात 300 कोटीहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेमुळे मार्केट यार्डातील धान्य आणि किराणा मालाची दुकाने मात्र सुरू ठेवली आहेत. 

"कोरोना' चे सावट असल्यामुळे गर्दी करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी देखील काही व्यापाऱ्यांनी सुरवातीला बेदाणा सौदे घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध झाल्यामुळे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नोटीस बजावल्यामुळे तो अयशस्वी झाला. त्यानंतर जिल्ह्यात "कोरोना' चे रूग्ण आढळल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा रोखण्यात आल्या आहेत. 
मार्केट यार्डात हळद, गुळ, बेदाणा आदी शेतीमालाचे सौदे काढण्यात येतात. त्यासाठी बाहेरून व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने येतात. गर्दीमुळे "कोरोना' चा प्रसार होऊ नये यासाठी सर्व शेतीमालाचे सौदे बंद ठेवण्याची मागणी काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी केली होती. 
गर्दी टाळण्यासाठी तसेच पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमुळे बाजार समितीने 18 जानेवारीपासून शेतमालाचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले दोन आठवडे सौदे बंद आहेत. बाजार समितीची रोजची उलाढाल सुमारे वीस ते पंचवीस कोटी रूपये होते. तेरा दिवसात हळद, बेदाणा आणि गुळाचे सौदे बंद राहिल्यामुळे सुमारे तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 14 एप्रिलपर्यंत "लॉक डाऊन' जाहीर केला आहे. त्यामुळे सध्यातरी 14 एप्रिलपर्यंत शेतमालाचे सौदे काढले जाणार नाहीत. 
लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आले आहेत. त्यामुळे मार्केट यार्डातील धान्याची सर्व दुकाने तसेच किराणा साहित्य मिळणारी दुकाने सुरू आहेत. तेथे थोडीफार गर्दी दिसत आहे. किरकोळ दुकानदार तेथून माल खरेदी करत आहेत. परंतू संचारबंदीमुळे तेथील उलाढाल फारसी नाही. 

""कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी बाजार समितीने सर्व शेतीमालाचे सौदे बंद ठेवले आहेत. शेतकरी, व्यापारी, हमाल आदींसह संबंधित सर्वच घटकांना फटका बसला आहे. कोरोना चा प्रसार रोखला गेल्यानंतरच सौदे सुरू होतील.'' 
-दिनकर पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती)