कोरोना इफेक्ट: कलींगडे शेतातच खराब

 Corona Effect : watermelon wasted in farm
Corona Effect : watermelon wasted in farm

बोरंगाव ः तासगाव तालुक्‍यातील अनेक भागांत कलींगडाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलेले दिसून येत आहे. "कोरोना' च्या भीतीमुळे कलींगडला मागणी नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांनी कलींगडाची लागण मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येत आहे. पीक दोन-तीन महिन्यांचे असते. त्यामुळे क्षेत्र वाढले आहे. "कोरोनो' मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हजारो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेले फ्लॉट जसेच्यातसे पडून आहेत. 15 - 20 रुपयांचा माल दोन ते तीन रुपयांना देण्याची वेळ आली आहे. "लॉकडाऊन' मुळे पूर्ण बाजरपेठ बंद आहे. शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. हातातोंडाला आलेले पीक शेतात खराब होत चाललेय. 

"लॉकडाउन'मुळे व्यापारी शेतात येऊन माल घेण्यास तयार नाही. त्यांच्याकडून मागणी दोन ते तीन रुपयांना असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघेना असे झाले आहे. शेतात पडून असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

प्रशासनाकडून मालवाहतूकीचा परवाना मिळाला. परंतू कुठलाच व्यापारी माल नेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे शेतकरी वेगळ्याच संकटात सापडला आहे. कलींगडापासून उत्पन्न नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काहींनी शेतात उभ्या पिकांत रोटर फिरवला आहे. 

बाजारपेठ ठप्प असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. पिक रानात खराब होऊ लागलेय. शेतात मालाची नासाडी होताना पाहवेना. त्यामुळे शेतकऱ्याचा डोळ्यातील अश्रुही थांबेनात असे चित्र आहे. 

सरकारने गांभीर्याने दखल घेऊन मार्ग काढावा

शेतकऱ्यांच्या माल शेतात पडून खराब होत आहे. सरकारने गांभीर्याने दखल घेऊन काही तरी मार्ग काढावा. संकटातून वाचवावे.

- विशाल कवठेकर, शेतकरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com