तमाशाची राज्यातील 100 कोटींहून अधिक उलाढाल थांबली

tamasha
tamasha


नवेखेड: गावा गावातील जत्रा यात्रा बंद झाल्याने पायातील घुंगरांचा आवाज थांबला आहे. ढोलकीची बोटे स्थिरावली आहेत. तमाशाला उडणारे फेटे बंद झाले. छकड़, बतावणी तुन निघणारे हास्याचे फवारे थांबले आहेत. तमाशा मुळे राज्यातील100 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल थांबली आहे.

महिन्याभरापूर्वी कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली सर्वत्र लॉक डाऊन लागू करण्यांत आले. हा  संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळली जाऊ लागली सुरुवातीला जाहीर सभा बंद झाल्या. अनेक कार्यक्रम रद्द झाले. त्याच्या पुढील टप्पा म्हणून गावोगावी होणाऱ्या जत्रा यात्रा बंद झाल्या. फेब्रुवारी ते मे  दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या त्याप्रमाणात यात्रा भरतात. या यात्रामधून करमणुकीच्या कार्यक्रमाची रेलचेल असते. 

यात्रेत तमाशा हा असतोच. या तीन चार महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून तमाशा कलावंत काही रक्कम बिदागी म्हणून मिळतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फडमालक ही गाडी तंबू  कलाकारांना उचल  देऊन मोठी गुंतवणूक करायचा. कलाकारांना दोन रुपये मिळायचे हे दिवस परंतु यात्राच रद्द झाल्याने व तमाशा थांबल्याने कलावंतांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.

त्याच्या गाड्या जागेवर थांबून आहेत. तमाशात काम  करण्यासाठी आलेले कलाकार आपापल्या गावाकडे परतले आहेत. शुगर बीपी आजाराने यातील काही जण त्रस्त आहेत. त्यांच्याजवळ औषधोपचारासाठी पैसे नाहीत. काहीजण मोलमजुरी करून कशीतरी गुजराण करीत आहेत. काहींनी व्याजाने पैसे घेऊन  आपला चरितार्थ चालू ठेवला आहे. तमाशाचा हंगाम यावर्षी संपल्यात जमा आहे.

नारायणगाव, धुळे, कर्जत, विटा, कराड या ठिकाणी अद्यापही तमाशाच्या गाड्या थांबून आहेत. कलाकार गावाकडे गेले असले तरी तमाशातील कर्मचारी थांबून आहेत. त्यांना संबधीत तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून जेवणाची सोय केली जाते. लॉक डाऊन च्या सुरवातीच्या कालात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मोलाचे सहकार्य या तमाशा कलावंतांना मिळाले

सध्या या घडीला मोठे तमाशा फड म्हणून मंगला बनसोडे,
पांडुरंग मुळे, विठाबाई नारायणगावकर, आनंद महाजन जलगावकर, मालती इनामदार, आनंदा कचोरे धुळेकर तर छोटे फड म्हणून वसंत वडेलर, तानाजी वाघिरीकर, कमल कराडकर, रेखा पाटील कोल्हापूरकर, महादेव मनवकर, सुदाम साठे म्हसोलीकर हे चर्चेत आहेत.

--------------

कोरोना मुळे धंदा पूर्ण थांबला धंद्यावर केलेली उसनवारी कशी फेडायची या विवंचनेत आम्ही आहोत सरकारनेतमाशा कलावंतांना मदतीचा हात द्यावा

सुनील वाडेकर
प्रमुख सोनाली गजरा लोकनाट्य तमाशा
केंद्र कराड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com