बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांना कोरोना; मुंबईत उपचार सुरु 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सांगली ः भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पार्किन्सन या जुन्या आजारावर उपचारासाठी आधीपासूनच ते या रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती स्थिर असून समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांचे चिरंजीव गौतम यांनी केले आहे. 

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सक्रिय राजकारणातून दूर झालेल्या संभाजी पवार यांनी अधिक वेळ प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष दिले. त्यातून वेळ काढून येते मारुती चौकात येत. तेथे कार्यकर्त्यांशी, सर्वसामान्यांशी गप्पा मारत. त्यांच्या समस्या सोडवण्याची सूचना करत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मात्र त्यांनी सक्तीने घरी विश्रांती घ्यावी, असे कुटुंबियांनी ठरवले आणि त्यानुसार ते घरीच होते. त्यांची प्रकृती उत्तम होती.

अलिकडेच त्यांना मुंबईत उपचारासाठी नेले होते. तेथे त्यांना कोरोनाची बाधा झाली असून उपचार सुरु करण्यात आले आहेत. गौतम पवार यांनी नानावटी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी कुटुंबियांना दिलेल्या माहितीनंतर कार्यकर्त्यांना "आप्पांची प्रकृती स्थिर आहे', असा संदेश दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to former MLA Sambhaji Pawar; Treatment started in Mumbai