युवकासह चौघांचा "कोरोना' ने मृत्यू; नवे 61 रूग्ण...598 जणांवर उपचार सुरू, 24 जण चिंताजनक, रूग्णसंख्या 1074 

घनशाम नवाथे
Monday, 20 July 2020

सांगली- जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी 61 रूग्ण "कोरोना' बाधित आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील 31, शिराळा व मिरज तालुक्‍यात प्रत्येकी सात, पलूस तालुक्‍यात सहा, वाळवा तालुक्‍यात चार, आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्‍यात दोन आणि अंकले (ता. जत), विटा (ता. खानापूर) येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील आजअखेर कोरोना बाधितांची संख्या 1074 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात बांबवडे (ता. पलूस) येथील वृद्धासह मिरजेतील दोन आणि सांगलीतील एक अशा चौघांचा "कोरोना' मुळे मृत्यू झाला. त्यामध्ये मिरजेतील 19 वर्षीय युवकाचा समावेश आहे. आजअखेर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चौघेजण कोरोनामुक्त झाले. 

महापालिका क्षेत्रात रविवारी 40 रूग्ण आढळले होते. त्यानंतर आज आणखी 31 रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीतील 23 आणि मिरजेतील आठ रूग्णांचा सहभाग आहे. कुपवाडमधील कापसे प्लॉटमध्ये आज 27 वर्षीय तरूण "पॉझिटीव्ह' आढळला. त्याच्या कुटुंबातील अन्य दोघेजण यापूर्वी पॉझिटीव्ह आढळले आहेत. 31 रूग्ण वाढल्याने महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या 362 झाली आहे. आज मिरज तालुक्‍यातील अंकली येथे चार, बिसूरमध्ये दोघे तर नांद्रे येथे आणखी एक रूग्ण आढळला. शिराळा तालुक्‍यात आज सात रूग्ण आढळले. ते गुढे, बांबवडे आणि गवळेवाडी येथील आहेत. पलूस तालुक्‍यातील बांबवडे येथे दिवसभरात सहा रूग्ण आढळले. 

वाळवा तालुक्‍यातील वाटेगाव, बहे येथे एक आणि रोजेवाडीत दोन रूग्ण कोरोना "पॉझिटीव्ह' असल्याचे स्पष्ट झाले. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण आणि केरेवाडी येथे प्रत्येकी एक रूग्ण बाधित आढळला. आटपाडी तालुक्‍यातील दिघंची आणि माडगुळे येथे एक रूग्ण आढळला. तसेच अंकले (ता. जत) आणि विटा (ता. खानापूर) येथील प्रत्येकी एक रूग्ण "पॉझिटीव्ह' आला.

बांबवडे (ता. पलूस) येथील 70 वर्षीय वृद्धाचा रविवारी उशिरा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल आज "पॉझिटीव्ह' आला आहे. मिरजेतील वाळवे गल्ली येथील 58 वर्षीय पुरूषाचा आज पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर मिरजेतीलच शिवाजी चौक येथील 19 वर्षीय युवकाचा देखील पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच खणभागातील 58 वर्षाच्या निवृत्त पोलिस अधिकारी यांचा पहाटे मृत्यू झाला. चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आजअखेर मृतांची संख्या 38 इतकी झाली आहे. तर सद्यस्थितीत 24 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यापैकी 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच दिवसभरात चौघेजण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 598 रूग्ण आणि जिल्ह्याबाहेरील 63 रूग्ण उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र- 

 • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण- 1074 
 • उपचार घेत असलेले रूग्ण- 598 
 • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 439 
 • आजअखेर मृत झालेले रूग्ण- 38 
 • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक रूग्ण- 24 
 • ग्रामीण भागातील एकुण रूग्ण- 628 
 • शहरी भागातील एकुण रूग्ण- 84 
 • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 362 
   
 • तालुकानिहाय आजअखेर रूग्ण- 
  आटपाडी-82, जत-107, कडेगाव-51, कवठेमहांकाळ-29, खानापूर-35, मिरज-73, पलूस-67, शिराळा-157, तासगाव-28, वाळवा-83, महापालिका क्षेत्र-362. 
   
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona kills four, including youth; 61 new patients. 598 under treatment, 24 critical, 1074 patients