सांगलीत दोघांचा "कोरोना' ने मृत्यू...दिवसभरात 23 रूग्ण आढळले... रूग्णसंख्येचा सातशेचा टप्पा पार

घनशाम नवाथे
मंगळवार, 14 जुलै 2020

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात 23 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील सात, कडेगाव तालुक्‍यातील आठ, जत तालुक्‍यातील निगडी येथील तीन, बामणोली (ता. मिरज) येथील दोन, आगळगाव, कोकळे (ता. कवठेमहांकाळ), भोसे (ता. मिरज) येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याने आज सातशे रूग्णाचा टप्पा पार केला. आजअखेरची रूग्णसंख्या 704 इतकी झाली आहे. तर आज दुर्दैवाने सांगलीतील चांदणी चौकातील 69 वर्षीय वृद्धाचा आणि वडर गल्लीतील 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

सांगली-  जिल्ह्यात आज दिवसभरात 23 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील सात, कडेगाव तालुक्‍यातील आठ, जत तालुक्‍यातील निगडी येथील तीन, बामणोली (ता. मिरज) येथील दोन, आगळगाव, कोकळे (ता. कवठेमहांकाळ), भोसे (ता. मिरज) येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याने आज सातशे रूग्णाचा टप्पा पार केला. आजअखेरची रूग्णसंख्या 704 इतकी झाली आहे. तर आज दुर्दैवाने सांगलीतील चांदणी चौकातील 69 वर्षीय वृद्धाचा आणि वडर गल्लीतील 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात सोमवारी 40 नवे रूग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आज दिवसभरात 23 रूग्ण वाढले. महापालिका क्षेत्रात आज सात रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीत 27 वर्षीय तरूण, 65 वर्षाचा वृद्ध आणि 42 व 63 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर मिरज शहरात आज तिघेजण कोरोना बाधित आढळले. त्यामध्ये दोघा डॉक्‍टरांचा समावेश आहे. शहरातील सुंदरनगर परिसरात राहणारे एका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या संचालक डॉक्‍टरांचा खासगी तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आला होता. शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता तेथील अहवालही "पॉझिटीव्ह' आला. तसेच एका खासगी रुग्णालयाची संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी डॉक्‍टरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. रेवणी गल्ली परिसरात तेरा वर्षाचा मुलगाही बाधित आढळला. 

कुपवाडजवळील बामणोली गावात भैरवनाथ मंदिराच्या परिसरात आढळलेल्या 52 वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची व्यक्तीची 72 वर्षीय आई आणि 32 वर्षाचा मुलगा यांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तर संपर्कातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला. कवठेमहांकाळ तालुक्‍यात आगळगाव येथे 52 वर्षाची महिला, कोकळे येथे 32 वर्षाचा पुरूष असे दोन रूग्ण आढळले. भोसे (ता. मिरज) येथे 20 वर्षाची तरूणी कोरोना बाधित आढळली. जत तालुक्‍यात निगडी येथे 34 वर्षाची महिला आणि 19 व 17 वर्षाची मुले कोरोना बाधित आढळली. कडेगाव तालुक्‍यात आज आठ रूग्ण आढळले. त्यामध्ये भिकवडी खुर्द येथे 42 वर्षाचा पुरूष, 82 वर्षाचे वृद्ध, 40, 65 व 50 वर्षाची महिला आणि दोन वर्षाचा मुलगा तसेच चिंचणी येथील 36 वर्षाचा पुरूष व हिंगणगाव येथील 34 वर्षाचा पुरूष यांचा समावेश आहे.

आज सांगलीतील चांदणी चौक येथे राहणाऱ्या 69 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते डॉक्‍टरांचे चुलते होत. सदर डॉक्‍टरांचे विश्रामबाग चौक परिसरात हॉस्पिटल आहे. डॉक्‍टरांचा एका संस्थेचा कोरोना अहवाल "पॉझिटीव्ह' आहे. मात्र शासकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील वडर गल्लीत राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. आज 36 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 15 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तसेच इचलकरंजीतील 16 वर्षाचा मुलगा आज येथे कोरोना बाधित आढळला. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे एकुण रूग्ण- 704 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 306 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 375 
  • आजअखेर मृत झालेले रूग्ण- 23 
  • चिंताजनक असेलेले रूग्ण- 13 
  • ग्रामीणमधील एकुण बाधित- 512 
  • शहरातील एकुण बाधित- 68 
  • महापालिका क्षेत्र बाधित- 124 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona" kills two in Sangli. 23 patients were found in a day . the number of patients crossed the 700 mark