कोरोना संपलेला नाही, पुन्हा डोकवर काढतोय; पालकमंत्री जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगली जिल्ह्याच्या 60 व्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या एका मेळाव्यात केक कापण्यात आला.

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या 29 वरुन 70 वर पोहोचली आहे. कोरोना संपलेला नाही ते पुन्हा डोके वर काढतोय. दिवाळी सणातील गर्दीचे पडसाद 15-20 दिवसात उमटतील. आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्कतेचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. 

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगली जिल्ह्याच्या 60 व्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या एका मेळाव्यात केक कापण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, दिवाळी खरेदीवेळी लोकांनी बाजारपेठेत केलेल्या गर्दीचे पडसाद येत्या 15-20 दिवसात उमटतील. या पार्श्‍वभूमिवर आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तंज्ज्ञ लोकांचाही तसा अंदाज आहे. चीनमध्ये पुन्हा रुग्ण सापडत आहेत. देशातही कोवीड पश्‍च्यात पुन्हा लाट येत आहे. सांगली जिल्ह्यातही तशी शक्‍यता लक्षात घेवून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. सांगली जिल्ह्यात 29 वरुनची रुग्णसंख्या 70 वर पोहोचली आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवूनच यापुढे दक्षता घ्या. अन्यथा पुन्हा एकदा गंभीर परस्थिती ओढवू शकते. याचा विचार करा.' 

मंत्री पाटील म्हणाले,"" कोरोना संपलेला नाही याचा विचार करुनच सरकारने मंदिरे उशिरा उघडली. थाळ्या आणि दिवे लावून कोरोना पळाला नाही. देशाला कोणत्या दिशेने नेले जातेय, हेच समजत नाही. व्यवहार पूर्वपदावर आले तरीही काळजी घेणे गरजेचेच आहे. भाजप सरकार अपेक्षापुर्ती नव्हे तर त्यांनी बेरोजगारीसह अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is not finished, heading back; Guardian Minister Jayant Patil