शिराळा तालुक्‍यात मोहरे येथे वृद्धाच्या भावालाही "कोरोना' : गावचे प्रवेशद्वार केले बंद

mohare village.jpg
mohare village.jpg
Updated on

शिराळा (सांगली) - मोहरे येथील मुंबईहून आलेल्या 50 वर्षीय वृद्धाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या 60 वर्षीय मोठ्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मोहरे येथे कोरोना बधितांची संख्या दोन झाली आहे.


कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 14जणांच्या घशाचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्या पैकी 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते कुटुंब मुंबईहून 15मे रोजी येऊन गावात होम क्वारंटाईन झाले होते. त्यांतील 50वर्षीय वृद्धाला बुधवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला.त्यानंतर रात्रीच आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील 14जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे नमुने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्या पैकी 13जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्या वृद्धांच्या मोठ्या भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या गावाची लोकसंख्या 623 असून 150कुटुंब आहेत.त्या ठिकाणी 3पथकांच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे सुरू आहे. गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार चरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम. जमादार, डॉ.शाहीद कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक एस.वाय. धुमाळ,नजीर मुल्ला, आशा गट प्रवर्तक मनीषा पाटील,एस.बी.संदे, जयश्री शेडगे,छाया कुंभार,शारदा पाटील,लक्ष्मी बागडे,प्रकाश शिंदे यांचे पथक घरोघरी जावून सर्व्हे करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

With rainfall easing in the Koyna dam catchment, authorities reduced the dam gate opening from six feet to five feet, lowering the water discharge to 30,223 cusecs into the Koyna river.
Anna Bhau Sathe Jayanti significance
Sangli flood risk due to Almatti Dam
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Marathi News Esakal
www.esakal.com