esakal | कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तरुणाची बर्थडेलाच आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तरुणाची बर्थडेलाच आत्महत्या

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तरुणाची बर्थडेलाच आत्महत्या

sakal_logo
By
दिपक पवार

इटकरे : कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आल्याच्या भितीतून येथील तरुण अभियंता निखील लक्ष्मण भानुसे (वय 28) याने आपल्या वाढदिवसादिवशीच (birthday) गळफास घेत आत्महत्त्या केली. (crimecase) बुधवारी रात्री ही घटना घडली. केवळ तीन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या तरुणाच्या अशा मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: '.... अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू'' ;संभाजीराजे

निखील हळव्या स्वभावाचा होता. तो सिव्हील इंजिनीअर होता. त्याचा केवळ तीन महिन्यापुर्वी विवाह झाला आहे. नुकतीच त्याने या परिसरात बांधकाम व्यवसायासही सुरुवात केली होती. दरम्यान चार दिवसापुर्वी त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासूनच तो चिंतेत व अस्वस्थ होता. या नैराश्येतूनच बुधवारी वाढदिवसा दिवशीच रात्री त्याने घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केली. कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. कोरोना झाल्याच्या भितीतून त्याने आत्महत्त्या केल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. निखिलच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

loading image