मांगलेतील खासगी डॉक्‍टरांना कोरोना 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg
Updated on


मांगले (सांगली) ः मांगले गावातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतील एका खाजगी डॉक्‍टरचा कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटीव्ह आला. गावाच्या भर वस्तीत एक डॉक्‍टरच पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

.
त्या कोरोनाबाधित डॉक्‍टरांच्या संपर्कात जे नातेवाईक, मित्र, रुग्ण आले त्यांचाही शोध आज तातडीने सुरू करण्यात आला. क.ोरोना बाधित डॉक्‍टर व त्यांचा भाऊ, दोघांना डेंगुची लागण झाली होती. त्यासाठी त्यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी बाधित डॉक्‍टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचे स्वॉब रविवारी सायंकाळी घेण्यात आले होते. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

संबंधित डॉक्‍टर हे नेमके कोणाच्या संपर्कात आले आहेत. त्याचा शोध घेण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे. दरम्यान, कोरोना बाधित डॉक्‍टरांची, पत्नी, मुलगी व भाऊ यांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत. आज डॉक्‍टरांची भावजय, पुतण्या यांचे स्वॉब घेण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले कर्मचारी, तसेच रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. मुख्य बाजार पेठेत संपूर्ण गाव बंद केले आहे.

तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, सरपंच मीनाताई बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरूटे, तलाठी बगडी, ग्रामविस्तार अधिकारी, एन. ए. कारंडे यांनी भेट दिली. मांगले परिसरात पहिलाच रुग्ण सापडून आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com