"कोरोना रिटर्न' जिल्ह्यात घडलेले नाही - डॉ. संजय साळुंखे 

अजित झळके
Wednesday, 30 September 2020

"अँटी बॉडीज्‌' तयार झाल्याने प्रतिकार करण्याची क्षमता वाढलेली असते, त्यामुळे कोरोना मुक्तांनी काळजी करू नये, असे सांगितले जातेय. मग, ही बातमी कुठून आली? पुन्हा कोरोना झालाय, असे का सांगितले जात आहे, याची शहानिशा डॉ. साळुंखे यांच्याकडून करून घेतली. 

सांगली ः कोरोना मुक्त झालेल्या रुग्णा पुन्हा कोरोनाची लागण होते आहे, अशी एक बातमी सध्या चर्चेत आहे. काही लोक रुग्णाच्या नावा-गावासह ते सांगत आहेत. त्यामुळे त्यावर विश्‍वास ठेवला जात आहे. त्याची शहानिशा केल्यानंतर "असे काही घडलेले नाही, असे काही घडत नाही' असे सांगत कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी "कोरोना रिटर्न' जिल्ह्यात घडले नसल्याचे "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

जिल्ह्यात 36 हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 26 हजार रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. 8 हजाराहून अधिक लोक उपचार घेत आहेत. पैकी 70 टक्के लोकांवर घरी थांबून उपचार केले जात आहेत. मृत्यूदर चिंताजनक आहे. या स्थितीत "कोरोना पुन्हा होतोय', या बातमीने लोकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण तयार झाले आहे. विशेषतः कोरोनामुक्त झालेल्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. कारण, याआधी एकदा कोरोना होऊन केला की किमान दोन महिने तुमच्यापासून कुणाला धोका नाही आणि तुम्हाला कोरोनाचा धोका नाही, असे सांगण्यात येत होते.

"अँटी बॉडीज्‌' तयार झाल्याने प्रतिकार करण्याची क्षमता वाढलेली असते, त्यामुळे कोरोना मुक्तांनी काळजी करू नये, असे सांगितले जातेय. मग, ही बातमी कुठून आली? पुन्हा कोरोना झालाय, असे का सांगितले जात आहे, याची शहानिशा डॉ. साळुंखे यांच्याकडून करून घेतली. 

डॉ. साळुंखे म्हणाले, ""एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा बाधा झालीय, असे जिल्ह्यात घडलेले नाही. तसे अन्यत्र कुठे घडलेय, असेही माहिती नाही. एक मात्र लक्षात घेतले पाहिजे, कोरोना मुक्त झाल्यानंतर वेगळ्या प्रकारचा ताप येऊ शकतो. तो आला आणि पुन्हा तपासणी केली तर मृत विषाणूंचे शरिरातील अस्तित्व हे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह दाखवू शकते. तो कोरोना असत नाही. त्यामुळे काळजी करू नये. अर्थात, ताप व अन्य लक्षणांची तपासणी करून घ्यावी, उपचार घ्यावेत.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona return, no single case in sangli district - dr. salunkhe

Tags
टॉपिकस
Topic Tags: