कोरोना नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार; बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

corona rules not follow then action from government in belgium said collector
corona rules not follow then action from government in belgium said collector
Updated on

बेळगाव : जनतेच्या आरोग्य हितदृष्टीने कोरोनाबाबतचे नियम काटेकोर पाळणे जरुरी आहे. पहिल्यांदा नियमावली उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती वा आयोजकांकडून दंड आकारण्यात येईल. सतत नियमावली मोडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंदविला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला. 

बेळगावसह राज्यात अलीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यासाठी कठोर नियमावली जारी झाले आहेत. त्याचे पालन होणे जरुरी आहे. संसर्ग थोपविण्यासाठी नियम पाळण्यात यावे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यात कोरोनाचे नियम पाळण्यात यावे. आचारसंहितेचे उल्लंघन न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजाविले आहेत. 

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर प्रादुर्भाव वाढून बाधितांची संख्या वाढली. त्याचे व्यापक परिणाम विविध क्षेत्रांना झाले. आर्थिक आणि सामाजिक पातळीवरती परिणाम दिसले. आरोग्य व्यवस्था कोलमडली. पण, मध्यंतरी रोग नियंत्रणाखाली होता. बाधितांची संख्या कमी झाली होती. पण, अलिकडे परत कोरोना पाय पसरतो आहे. बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे कोरोना संबंधीत नियम काटेकोर पाळणे जरुरी आहे. यासाठी प्रत्येकांनी काळजी घ्यावी.

कोरोना नियमालीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, कार्यक्रम आयोजक किंवा तत्सम घटकांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल. यानंतरही सुधारणा न दिसल्यास आणि परत परत कोरोना संदर्भातील नियमावली मोडण्यात आल्यास गुन्हा नोंदविला जाईल. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी हरिशकुमार यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com