साळशिंगेत पुन्हा एकदा "कोरोना' चा शिरकाव 

सचिन निकम 
Friday, 24 July 2020

लेंगरे (सांगली)- साळशिंगे(ता. खानापुर) येथे एका बत्तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा तरुण मुंबईहून बुधवारी (ता.22) साळशिंगेला आलेला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील तिघांना संस्थात्मक क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर अनिल लोखंडे यांनी दिली. तालुक्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 43 वर पोहोचला आहे 

लेंगरे (सांगली)- साळशिंगे(ता. खानापुर) येथे एका बत्तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा तरुण मुंबईहून बुधवारी (ता.22) साळशिंगेला आलेला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील तिघांना संस्थात्मक क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर अनिल लोखंडे यांनी दिली. तालुक्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 43 वर पोहोचला आहे 

मुंबईत वास्तव्यास असलेला आणि मुळचा साळशिंगे येथील रहिवासी असलेला तरुण मुंबईहून कराड येथे आला होता. हा तरुण मुंबईतून आल्यानंतर 16 जुलै ते 19 जुलै पर्यंत कराड येथील नातेवाईकाकडे वास्तव्यास होता. त्यानंतर त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने तो साळशिंगे या मुळ गावी आला. त्याला कोरोना सदृश्‍य लक्षण आढळून आल्यामुळे मिरज कोव्हीड रुगणालयात त्याच दिवशी रोजी उपचारासाठी पाठवले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अहमदाबाद, मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना कोरोना झाल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत प्रशासन,तालुका प्रशासनाने सतर्कता बाळगत कोरोनाला रोखून ठेवले होते. मात्र मुंबईहून आलेल्या या रुगणामुळे साळशिंगेत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने लोक पुन्हा धास्तावले आहेत. 

ग्रामीण भागातही कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रार्दुभाव पाहता जनता कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरी भागासाठी जे नियम घालून देत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्याच नियमांचा अवलंब ग्रामपंचायत प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन समितीने काटेकोरपणे नियम पाळल्यास कोरोनाच्या या साखळीला ब्रेक लागण्यास मदतच आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी डॉक्‍टर, पोलिस प्रशासन रात्रंदिवस झटत आहेत. याची जाणीव देखील लोकांनी ठेवून विनाकारक बाहेर न पडता घरात थांबुनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे. 
 

नागरी भागासाठी लॉकडाऊन असला तरी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन समिती,पोलिस पाटील यांनी ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळत मर्यादीत वेळेत व्यवहार सुरु ठेवून मास्क, सॅनिटायझर आदीचा वापर करावा. विनाकारण फिरणाऱ्यांवर स्थानिक संस्थांनी प्रतिबंध घालून पोलिस प्रशासन सहकार्य केल्यास पोलिस बांधवाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या मानवी साखळीला ब्रेक लागण्यास हातभार लागेल. 
- रविंद्र शेळके (पोलिस निरिक्षक) 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "corona" in the salshinge once again