वाळवा तालुक्‍यातील सात जणांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

. तो पुण्याहून 20 जुलै रोजी इस्लामपुरात आला आहे. 

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील सात जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. 

इस्लामपूर शहरातील किसानगर येथे बुधवारी (ता. 29) पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरातील कोरोनाबाधित महिलेचा पती व सून दोन्ही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ब्राह्मणपुरी परिसरातील 30 वर्षांचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. तो पुण्याहून 20 जुलै रोजी इस्लामपुरात आला आहे. 

शिगाव (ता. वाळवा) येथे दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये शिरोली एमआयडीसी येथे काम करत असलेल्या 49 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. तर तारदाळ एमआयडीसी येथे काम करत असलेल्या 55 वर्षीय पुरुषही पॉझिटिव्ह आला आहे. कोरेगाव (ता. वाळवा) येथील वारणा दूध संघामध्ये काम करत असलेला 52 वर्षाचा पुरुष पॉझिटिव आला आहे. तसेच भडकंबे येथील 31 वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे तो वाहन चालक म्हणून काम करतो. 

संपादन ः धर्मवीर पाटील 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to seven people from Valva taluka