सांगलीत माजी नगरसेवक पुत्राला कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

माजी नगरसेवक पूत्र हेही व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनाही घरीच थांबा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

सांगली ः येथील महापालिकेच्या माजी नगरसेवकाच्या पुत्राला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल एका खासगी लॅबमधून समोर आला आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी संबंधित तरुणाचा स्वॅब मिरजेतील कोरोना रुग्णालयात तपासणीसाठी देण्यात आला आहे. तरुणालाही तेथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरले असून माजी नगरसेवकाच्या संपर्कातील अनेकांना चिंता वाटू लागली आहे. 

सांगली, मिरज शहरात कोरोना बाधितांचा आकडा गतीने वाढू लागला आहे. मंगळवारी चार बाधित आढळले होते. त्यात एका डॉक्‍टरचा समावेश होता. त्यामुळे आज बुधवारी रुग्णसंख्या वाढण्याची भिती व्यक्त होती होती. त्यात ही नवी बातमी समोर आल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माजी नगरसेवक पूत्र हेही व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांनाही घरीच थांबा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, कडेगाव तालुक्‍यातील सोनसळ गावातील एक 55 वर्षीय महिला कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनसळ गावात एकच खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to the son of a former corporator in Sangli