सांगली झेडपी अध्यक्ष कक्षात  दोन शिपायांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कक्षातील दोन शिपायांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज दुपारी त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

सांगली ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कक्षातील दोन शिपायांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज दुपारी त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जिल्हा परिषदेत एकच धावाधाव सुरु झाली. अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी त्यानंतर शिक्षण व आरोग्य विभाग सभापतींच्या कक्षात थांबून कामाचा आढावा घेतला. 

जिल्हा परिषदेत गेल्या दीड महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. येथेच कोविड वॉर रुम आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी सातत्याने कोरोना नियोजनात व्यस्त आहेत. अनेक अधिकाऱ्यांचा येथे राबता आहे. याशिवाय, जिल्हाभरातून लोक येत असतात. त्यामुळे कितीही खबरदारी घेतली तरी जिल्हा परिषद सतत हॉट स्पॉट राहिली आहे. आज त्यात आणखी दोघांची भर पडली. 

अध्यक्षा प्राजक्ता कोरे म्हणाल्या, ""जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी सतत कामात आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची भिती जास्त आहे. त्यांनी खचून न जाता काळजी घ्यावी. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. साऱ्यांना खबरदारी घ्यावी.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to two soldiers in the Sangli ZP president's room