esakal | इथे टीमवर्कने रोखले कोरोनाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona was stopped by teamwork in the Sangali municipal area

सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या टीमवर्कमुळे कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सांगली महापालिका क्षेत्रात सापडला नाही, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

इथे टीमवर्कने रोखले कोरोनाला...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्ह्याचे नाव कोरोनाबाधितांच्या यादीत गेल्या महिन्यात अग्रस्थानी झळकल्यानंतर सांगलीकरांचे धाबे दणाणले असताना महापालिका प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलल्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले. सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या टीमवर्कमुळे कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण महापालिका क्षेत्रात सापडला नाही, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

आयुक्त कापडणीस म्हणाले,""कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य सेविका आणि आशा वर्कर मार्फत होम टू होम सर्व्हे करण्यात आला. परदेशातून आलेले तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले लोक शोधून त्यांना होम क्वारंटाईन केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता आला.

पीपीए कीट, मास्क, ग्लोव्हज यांची उपलब्धता पाहून त्या तातडीने उपलब्ध करून दिल्या. जंतुनाशक औषधे सुरवातीलाच उपलब्ध करून महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधित फवारणी करण्यात आली. यामुळे जंतुसंसर्गाला आवर बसला. याचा फायदा मनपा क्षेत्रात साथ रोग रोखण्यास आम्हाला झाला आहे. 

महापालिकेचे डॉक्‍टर, एएनएम, आशा वर्कर यांनी 24 तास झोकून काम केले. यामुळे एक-एक व्यक्ती शोधून त्यांची तपासणी केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सीईओ, सिव्हिल सर्जन आणि महापालिका आयुक्त म्हणून मी स्वत: असे आम्ही टीमवर्क म्हणून काम करत गेलो. अनेक चांगली माहिती, एकमेकांच्या सूचना एकमेकांना पाठवू शकलो. यामुळे महापालिका क्षेत्रात आजपर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही हे याच टीम वर्कचे यश असल्याचेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.''