कोरोनाचा फटका; बलवडीच्या शेतकऱ्याने विकल्या 34 गाई 

दिपक पवार
Friday, 24 July 2020

सतत च्या लॉकडाऊन मुळे गाईच्या दुध दरात कमालीची घट होत आहे. त्याचा फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

आळसंद : सतत च्या लॉकडाऊन मुळे गाईच्या दुध दरात कमालीची घट होत आहे. त्याचा फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचा प्रत्यय बलवडी भा. ( ता. खानापूर) येथील वसंत पवार या दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. दुध दरात कमालीची घट होत आहे. यामुळे 35 पैकी 34 गाई विकाव्या लागल्या आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास सतत लॉकडाऊन करावा लागत आहे. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना बसला आहे. गाईचे संगोपन करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे कवडीमोल दराने विकावी लागली आहेत. श्री. पवार यांनी दहा वर्षापूर्वी बंगलोर हून जर्जी गाई टप्प्या टप्प्याने आणल्या होत्या. गाईच्या दुधाला समाधानकारक दर मिळत असल्याने पैसै मिळत होते. त्याच्या जोरावर घर व गोठा बांधला. 

परंतु कोरोना मुळे दर कमी झाला आहे. चारा व आवश्‍यक खाद्य याचे दर कमी होत नाहीत. त्याचा सर्वाधिक परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. गाईंच्या दुध विक्रीतून मिळणारे पैसे व त्याच्यासाठी करावा लागणारा खर्च त्याचा ताळमेळ बसत गाई विकाव्या लागल्या आहेत. शासनाने गाईच्या दुध दरास तीस रूपये प्रति लिटर दर द्यावा, अशी मागणी आहे. 

दहा वर्षापूर्वी बंगलोरहून जर्सी गाई आणल्या. पाच लाख रुपये खर्चून गोठा बांधला होता. सध्या लॉकडाऊनमुळे गाईच्या दुध दरात मोठा फरक पडला आहे. त्यामुळे खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. दुर्दैवाने गाई विकाव्या लागल्या आहेत. 35 पैकी 34 गाई विकल्या आहेत. 
- वसंत पवार , दुध उत्पादक शेतकरी , बलवडी भा. ( ता. खानापूर) 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's blow; Balwadi farmer sold 34 cows