"करोना'चा फटका या व्यवसायाला बसणार ...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

करोना व्हायरसची दररोज सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवामुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवत देशी कोंबडा, मटनाला, शाकाहारी जेवणाला पसंती देण्यास सुरवात केली. त्यामुळे पोल्ट्री लघु उद्योजक अडचणीत सापडले आहे. 

लेंगरे : करोना व्हायरसचा फटका ग्रामीण भागातील चिकन व्यावसायिकांना बसल्याने ब्रायलर कोंबडीचे बाजारातले उतरले आहे. तर देशी कोंबड्याचे दर गगणाला भिडले आहेत. करोना व्हायरसची दररोज सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवामुळे लोकांनी चिकनकडे पाठ फिरवत देशी कोंबडा, मटनाला, शाकाहारी जेवणाला पसंती देण्यास सुरवात केली. त्यामुळे पोल्ट्री लघु उद्योजक अडचणीत सापडले आहे.

चीन मध्ये करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या झळा मात्र ग्रामीण भागापर्यत पोहोचल्या आहेत. कडकनाथ प्रकरणाचा धक्का पचतो न पचतो तो पर्यंत या व्हायरसच्या अफवेने ब्रायलर पोल्ट्री व्यवसायकावर पुन्हा घाला घातला आहे. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. भागात मोठ्या पोल्ट्री व्यवसाय केला जातो. यामध्ये अंडी, ब्रायलर अशा दोन विभागात व्यवसाय सुरू आहे.

यामध्ये अंडी पोल्ट्री धारकांचेही कमी जास्त दराने कंबरडे मोडले आहे. यातून उभारी मिळावी, तसेच जोडव्यवसाय म्हणून ब्रायलर पक्षाचे विक्री करून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. कमी वेळात ब्रायलर बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध होतो. मुंबई, पुणे, फलटण, बारामती या भागात मोठ्या प्रमाणात मागणी असते, मात्र करोना व्हायरसच्या अफवेने मागणीत चांगलीच घट झाली आहे. 

मटणाचे दर वाढल्याने हॉटेलाच्या जेवणावळीत चिकनच्या ताटाची मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील ब्रायलरचे दर स्थिर होते. अगोदरच बर्ड फ्लूच्या कचाट्यातून हा पोल्ट्री व्यवसाय सावरत असताना या व्हायरसमुळे हा व्यवसायात पुन्हा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सोशल मीडियावर चिकन खाल्याने व्हायरसची लागण होते असे सदेश फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी चिकन खाणे बंद केले आहे. सोशल मीडियात फिरत असलेल्या संदेशाचे खंडन अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी केले. परंतु व्यवसायाची परिस्थिती जैसे थी अशीच आहे. परंतु ब्रायलरला मागणी कमी झाली असली तरी देशी कोंबड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona's blow to this business ...