कोरोनाचा पलुस तालुक्यात पहिला बळी, जिल्ह्यात आजअखेर नऊजणांचा मृत्यू

corona
corona
Updated on

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. संबंधित 67 वर्षीय महिला आंधळी (ता. पलूस) येथील आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर मिरजेतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. पलूस तालुक्‍यातील पहिला, तर जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला हा नववा मृत्यू आहे. 
जिल्ह्यात मंगळवारी नव्याने सहा रुग्ण मिळून आले. शिराळ्यातील दाम्पत्य तर मणदूर येथे तीन आणि कसबेडिग्रज (ता. मिरज) येथील 42 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. त्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 260 झाली. सद्यस्थितीत 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पाच चिंताजनक; दहाजण कोरोनामुक्त 
साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरुष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरुष, अंकले (जत) येथील 66 वर्षीय पुरुष अशा पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शेटफळे, करगणी, लेंगरेवाडी (ता. आटपाडी), मालगाव (ता. मिरज), रिळे (ता. शिराळा), नेर्ली (ता. कडेगाव), पलूस, पेड (ता. तासगाव), सोनवडे (ता. शिराळा) येथील एकूण दहाजण कोरोनामुक्त झाले. 

कसबेडिग्रज भागात यंत्रणा सतर्क 
तुंग : मौजेडिग्रज (ता. मिरज) येथील बाधित 45 वर्षीय महिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. उपचार सुरू असलेल्या महिलेला पाहण्यास व सेवेसाठी एक दिवस ती रुग्णालयात राहिल्याचे समजते. घरी आल्यानंतर सर्दी व खोकला सुरू झाल्याने आरोग्य विभागाचे चेतन सूर्यवंशी, डॉ. ज्योती पाटील, आरोग्य सेवक अजय भानुसे यांनी स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले. आज सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला रहात असलेल्या भागासह परिसरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यांच्या संपर्कात आठजण असल्याचे समोर आले. त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आणखी कोण कोण होते, याचा शोध आरोग्य यंत्रणेने सुरु केला. या महिलेच्या कुटुंबातील एक व्यक्ती कर्मचारी आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेतला जाणार आहे, असे नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे चेतन सूर्यवंशी यांनी सांगितले. तहसीलदार रणजित देसाई, प्रांत समिर शिंगटे, मंडल अधिकारी विजय तोडकर यांनी भेट देऊन नागरिकांना सूचना केल्या. परिसर कंन्टेन्मेंट झोन केला आहे. कसबेडिग्रज, तुंगसह भागात भीतीचे वातावरण आहे. 


जिल्ह्याची स्थिती 
0 मंगळवारी आढळलेले बाधित - 6 
0 एकूण रुग्ण - 260 
0 उपचार घेणारे रुग्ण - 116 
0 बरे झालेले रुग्ण - 135 
0 आजवर मृत्यू झालेले - 9 
0 पॉझिटिव्ह पण चिंताजनक - 5 
0 ग्रामीणमधील बाधित - 202 
0 शहरी भागातील बाधित - 47 
0 महापालिका क्षेत्र- 11 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com