CoronaVirus : नगरमध्ये लॉक डाऊन! 

CoronaVirus: Locked Down in the City!
CoronaVirus: Locked Down in the City!
Updated on

नगर ः कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दोनवर पोचल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, खानावळी, परमिट रुम, बिअरबार, दुकानांना टाळेबंदीचा आदेश दिला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिला. 
जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा स्पर्धा, यात्रा-जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई केली आहे. मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स, अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल, विवाहस्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, शिबिरे, प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनासही बंदी घातली आहे. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशबंदी राहील.

दुकाने, सेवा आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्‍लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा-महाविद्यालय, खासगी क्‍लासेस, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लस, ऑनलाईन लॉटरी सेंटर, सर्व परमीट रुम, बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना येण्यास मनाई राहील. 

अत्यावश्‍यक सेवा सुरू 
शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे आस्थापना, अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्‍ती, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वेस्टेशन, एसटी बसस्थानक, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी, अत्यावश्‍यक किराणा साहित्य, दूध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी असेल. वृत्तपत्रे कार्यालये, वृत्तवाहिन्या सुरू राहतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com